South Africa vs Netherlands ICC Cricket World Cup 2023: नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिमाखदार विजय नोंदवल्यानंतर सांगितले की, तो उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या इराद्याने विश्वचषक २०२३ च्या मोहिमेत उतरला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात नेदरलँड्सने चांगली कामगिरी करत ३८ धावांनी स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. त्यांच्या या शानदार विजयाच क्रिकेटच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजयानंतर स्टार स्पोर्ट्स ब्रॉडकास्टरशी बोलताना एडवर्ड्स म्हणाला की, “शेवटपर्यंत टिकून राहण्याचे आमचे उद्दिष्ट असून दुसऱ्या बाजूने पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.” एडवर्ड्स पुढे म्हणाला, “माझ्या मते गेल्या काही सामन्यांमध्ये आमची समस्या डाव संपण्यापूर्वी विकेट्स गमावणे ही आहे. त्यामुळे मी खेळपट्टीवर टिकून स्ट्राईक रोटेट करण्याचा विचार केला आणि मला दुसऱ्या बाजूने चांगला पाठिंबा देखील मिळाला म्हणूनच आम्ही एवढी मोठी धावसंख्या उभारू शकलो.”

कर्णधार एडवर्ड्स पुढे म्हणाला, “रोएलॉफसोबत फलंदाजी करताना मला खूप मजा येत होती. तो खूप क्रिकेटच्या पुस्तकात नसलेले असे फटके मारतो आणि विकेट्सच्या दरम्यान वेगाने देखील धावतो, जे नेहमीच आव्हानात्मक असते. मी फक्त त्याला एक धाव काढून स्ट्राईक देत होतो आणि तो चौकार-षटकार मारत होता. निश्चितपणे मी काही काळामध्ये पाहिलेल्या सर्वोत्तम हिट्सपैकी एक, विशेषत: १०व्या क्रमांकाच्या फलंदाजाकडून अशी फलंदाजी पाहिली नव्हती.”

एडवर्ड्स म्हणाला, “मला माझ्या संघाचा खूप अभिमान आहे.आम्ही विश्वचषकात सेमीफायनलमध्ये खेळण्याची अपेक्षा ठेवून आम्ही स्पर्धेत आलो आहोत. त्यासाठी आम्हाला अव्वल संघांना पराभूत करावे लागेल आणि दक्षिण आफ्रिका या स्पर्धेत नक्कीच फेव्हरिट आहे. हा मोठा विजय मिळवून मला खूप आनंद झाला.”

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडने ४३ षटकांमध्ये ८ बाद २४५ धावा केल्या. तसेच, प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाच्या पहिल्या चार विकेट्स स्वस्तात पडल्या. एकंदरीत दक्षिण आफ्रिका संघ चांगलाच अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. २४६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ मैदानात आल्यानंतर त्यांच्या पहिल्या चार विकेट्स एकापाठोपाठ एक अशा पडल्या. संघाची धावसंख्या ११.२ षटकात ४४ असताना आफ्रिकेने पहिल्या चार विकेट्स गमावल्या होत्या. टेंबा बावूमा १६, क्विंटन डी कॉक २०, रासी वॅन डर ड्यूसेन ४, तर ऍडेन मार्करम १ धाव करून तंबूत परतले.

हेही वाचा: IND vs BAN: रोहितने बांगलादेशसाठी आखली रणनीती, सात वर्षानंतर हिटमॅनचे पुनरागमन; अश्विन गोलंदाजीचे धडे देतानाचा Video व्हायरल

या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्याच माजी खेळाडूने त्याच्याच संघाला आज पराभूत केले. रॉल्फ वॅन डर मर्व मूळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे. सध्या तो नेदरलँड संघाकडून विश्वचषक खेळत आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आजच्या सामन्यात महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने १९ चेंडूत २९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. कर्णधार स्कॉट ऍडवर्ड्सनंतर ही नेदरलँड संघासाठी सर्वात मोठी खेळी ठरली. रॉल्फने दक्षिण आफ्रिका संघाकडून कारकिर्दीत २९ आंतरराष्ट्रीय सामने खेळळे आहेत. यातील १७ सामन्यांमध्ये आफ्रिकी संघ जिंकला, तर १० सामन्यात पराभूत झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statement of netherlands captain scott edwards said had come to the world cup with the hope of playing in the semi finals avw