ऑस्ट्रेलियन क्रिकेटला प्रबळ करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्यांमध्ये ज्याचे नाव घेतले जाते, तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ हा सगळ्यात स्वार्थी क्रिकेटपटू होता, अशी टीका करून माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. वॉर्नच्या या टिप्पणीतून दोघांमधील वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
स्टीव्ह वॉ मला न आवडण्याची अनेक कारणे आहेत. पण त्यातले सगळ्यात मुख्य कारण म्हणजे तो खूप स्वार्थी आहे, अशी खोचक टीका शेन वॉर्नने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली. यावेळी वॉर्नने १९९९ सालच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेचा किस्सा देखील सांगितला. मी उपकर्णधार असूनही स्टीव्ह वॉने अखेरच्या सामन्यात मला स्वार्थी भावनेने डच्चू दिला, असे वॉर्न मुलाखतीत म्हणाला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 10-02-2016 at 08:30 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Steve waugh the most selfish cricketer shane warne