वेस्टइंडिजमधील पोर्ट ऑफ स्पेन स्टेडियमवर रंगलेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात पहिल्या चार चेंडूत कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सोळा धावा ठोकल्या आणि भारताने तिरंगी मालिका जिंकली. श्रीलंका संघाला २०१ धावांवर गुंडाळण्यात भारतीय संघाला यश आल्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना १६७ धावांवर आठ बाद अशी भारतीय संघाची बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, धोनी मैदानात असल्यामुळे प्रतिस्पर्धीच्या बाजूला झुकलेला सामना खेचून आणण्याचे धोनीचे कसब पुन्हा एकदा भारतीय प्रेक्षकांना पहावयास मिळाले. शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी पंधरा धावांची गरज असताना धोनीने पहिल्या चार चेंडूंमध्ये दोन षटकार व चौकार लगावत सामना जिंकला. धोनीने सामन्यात नाबाद ४५ धावा केल्या. धोनी सामनावीर तर, भुवनेश्वर कुमार मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-07-2013 at 06:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superb dhoni wins tri nation series for india