जगभरात सध्या करोनाची दहशत आहे. एका छोट्या विषाणूने साऱ्यांना ‘लॉकडाउन’ केले आहे. करोनाच्या भीतीपोटी सध्या जगभरातील बहुतांश देशात लॉकडाउन सुरू आहे. याचा फटका भारतातील लोकप्रिय IPL स्पर्धेला बसला असून स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू सध्या आपापल्या घरीच आहेत. काही लोक पूर्णपणे आराम करत आहेत. काही क्रिकेटपटू लाइव्ह चॅटमध्ये व्यस्त आहेत. काही क्रिकेटपटू टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. या दरम्यान, जुने फोटो पोस्ट करण्याचा एक ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे.

‘लॉकडाउन’मध्ये समायराला मिळाले नवे मित्र; रोहितने शेअर केला फोटो

आधी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू रवी बोपारा याने स्वत:चा लहानपणीचा फोटो पोस्ट केला होता, नंतर चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काही भारतीय क्रिकेटर्स एकत्र असलेला एक जुना फोटो शेअर केला होता. त्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार याने एक जुना फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोमध्ये प्रवीण कुमार, सुरेश रैना आणि रोहित शर्मा हे तिघे होते. त्यात आता भर म्हणून सुरेश रैनाचा आणखी एक जुना फोटो सोशल मीडियावर आला आहे.

आफ्रिदीने निवडला ‘वर्ल्ड कप स्पेशल’ संघ; सचिनऐवजी ‘या’ भारतीयाला स्थान

भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन याने एक त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये सुरेश रैना आणि स्वतः धवन व्यायाम करताना दिसत आहे. सुरेश रैनाने हाताने वजन उचलले आहे आणि त्यावेळी धवनने त्याचा फोटो काढला आहे. या फोटोखाली धवनने कॅप्शनही लिहिले आहे की सुरेश पैलवानला पाठिंबा देताना धवन पैलवान…

प्रविण कुमारने शेअर केला जुना फोटो, रोहित शर्मा म्हणतो…

हा फोटो सध्या खूप चर्चेत आहे. हे दोघे काही वर्षांपूर्वी कसे दिसत होते याची झलक बघायला मिळाल्यामुळे या फोटोवर अनेक लाईक्सदेखील मिळाले आहेत.