याया टोरेचे दोन गोल आणि जेम्स मिलनर व विलफ्रिड बोनी यांच्या प्रत्येकी एक गोलच्या बळावर मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये रविवारी स्वानसी सिटी संघावर ४-२ असा विजय साजरा करून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. मँचेस्टर सिटीच्या खात्यात ३७ सामन्यांत ७६ गुण जमा झाले
आहेत.
संथ सुरुवातीनंतर २१व्या मिनिटाला टोरेने गोल करून सिटीचे खाते उघडले. टोरेचा ईपीएलमधील हा पन्नासावा गोल ठरला. १५ मिनिटांनंतर मिलनरने सिटीची ही आघाडी दुप्पट केली. ४५व्या मिनिटाला स्वानसीकडून गिल्फी सिगुर्डसनने गोल करून मध्यंतरापर्यंत सामना २-१ असा आणला. त्यानंतर आर्सेनलविरुद्धच्या सामन्यात विजयी भूमिका वठवणाऱ्या बाफेटीम्बी गोमीसने स्वानसीसाठी दुसरा गोल केला आणि सामना २-२ असा बरोबरीत आणला. या लढतीत स्वानसी आघाडी घेईल असे वाटत असतानाच टोरेने पुन्हा एक गोल करून सिटीला ३-२ असे आघाडीवर नेले. त्यानंतर सिटीकडून बचावात्मक खेळ झाला. अतिरिक्त वेळेत सिटीकडून बोनीने गोल केला आणि ४-२ अशा विजयावर शिक्कामोर्तब केले.
संग्रहित लेख, दिनांक 18th May 2015 रोजी प्रकाशित
मँचेस्टर सिटी दुसऱ्या स्थानावर
याया टोरेचे दोन गोल आणि जेम्स मिलनर व विलफ्रिड बोनी यांच्या प्रत्येकी एक गोलच्या बळावर मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये रविवारी स्वानसी सिटी संघावर ४-२ असा विजय साजरा करून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-05-2015 at 12:56 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swansea 2 4 manchester city yaya toure scores twice