टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत अफगाणिस्तानला पराभूत करत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अफगाणिस्तानने २० षटकात ८ गडी गमवून १२४ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडसमोर विजयासाठी १२५ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान न्यूझीलंड २ गडी गमवून १९ षटकात पूर्ण केलं. न्यूझीलंडच्या विजयानंतर भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं आहे.
न्यूझीलंडचा डाव
अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या १२५ धावांचा पाठलाग करताना डेरिल मिशेलच्या रुपाने न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर मोहम्मद शहजादने त्याचा झेल घेतला. त्याने १२ चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर केन विलियमसन आणि गुप्टिल जोडीने डाव सावरला. संघाची धावसंख्या ५७ असताना मार्टिन गुप्टिल राशीद खानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने २३ चेंडूत २८ धावा केल्या. या खेळीत ४ चौकारांचा समावेश आहे. केन विलियमसन आणि डेवॉन कॉनवे यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि संघाचा विजय सोपा केला.
अफगाणिस्तानचा डाव
अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझ्रतुल्लाह झझाई आणि मोहम्मद शहजाद जोडी सलामीला मैदानात उतरली. मात्र सलामीची जोडी काही खास करु शकली नाही. एडम मिलनेच्या गोलंदाजीवर अफगाणिस्तानला पहिला धक्का बसला. मोहम्मद शहजाद ११ चेंडूत ४ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर लगेचच ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर हझ्रतुल्लाह झझाई २ धावा करून बाद झाला. . रहमनुल्लाह गुरबाज (६), गुलबदीन नइब १५ धावा करून माघारी पतरले. मात्र नजीबुल्लाह झाद्रनने एकाकी झुंज देत ४८ चेंडूत ७३ धावा केल्या. या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. शेवटच्या षटकात झटपट गडी बाद झाल्याने अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मोहम्मद नबी (१४), करिम जनत (२), राशीद खान (३) अशा धावा करत तंबूत परतले.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
न्यूझीलंडचा संघ- मार्टिन गुप्टिल, डेरिल मिशेल, केन विलियमसन, डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिशेल सॅन्टनर, एडम मिलने, टीम साउथी, इश सोढी, ट्रेन्ट बोल्ट
अफगाणिस्तानचा संघ- हझ्रतुल्लाह झझाई, मोहम्मद शहजाद, रहमनुल्लाह गुरबाज, नजीबुल्लाह झाद्रन, मोहम्मन नबी, गुलबदीन नइब, करिम जनत, राशीद खान, नवीन उल हक, हमिद हसन, मुजीब उर रहमान
नजीबुल्लाह झाद्रन नाबाद ४९ आणि मोहम्मद नबी नाबाद ७ धावा
नजीबुल्लाह झाद्रन नाबाद ३२ आणि मोहम्मद नबी नाबाद ६ धावा
नजीबुल्लाह झाद्रन नाबाद ३१ आणि मोहम्मद नबी नाबाद ५ धावा
नजीबुल्लाह झाद्रन नाबाद २९ आणि मोहम्मद नबी नाबाद ३ धावा
नजीबुल्लाह झाद्रन नाबाद २७ आणि मोहम्मद नबी नाबाद ० धावा
गुलबदीन नइब १८ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. इश सोढीच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला.
Chopped on!
— T20 World Cup (@T20WorldCup) November 7, 2021
Sodhi gets the wicket as Naib walks back for 15.
Afghanistan lose their fourth.#T20WorldCup | #NZvAFG | https://t.co/paShoZpj88 pic.twitter.com/Vl9XhBNdHv
नजीबुल्लाह झाद्रन नाबाद १३ आणि गुलबदीन नइब नाबाद १३ धावा
नजीबुल्लाह झाद्रन नाबाद ११ आणि गुलबदीन नइब नाबाद ११ धावा
नजीबुल्लाह झाद्रन नाबाद ५ आणि गुलबदीन नइब नाबाद ९ धावा
नजीबुल्लाह झाद्रन नाबाद ५ आणि गुलबदीन नइब नाबाद ५ धावा
रहमानुल्लाह गुरबाज ६ धावा करून बाद झाला. टीम साउथीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.
New Zealand well and truly on ?
— T20 World Cup (@T20WorldCup) November 7, 2021
Gurbaz is gone for 6 as Afghanistan lose their third.
Southee with the scalp. #T20WorldCup | #NZvAFG | https://t.co/paShoZpj88 pic.twitter.com/H0KHd88F3X
रहमानुल्लाह गुरबाज नाबाद ६ आणि गुलबदीन नइब नाबाद ५ धावा
रहमानुल्लाह गुरबाज नाबाद ४ आणि गुलबदीन नइब नाबाद ४ धावा
मोहम्मद शहजादनंतर हझ्रतुल्लाह झझाई २ धावा करून बाद झाला. सलामीचे दोन फलंदाज झटपट बाद झाल्याने अफगाणिस्तानवर दडपण आलं आहे.
Afghanistan are two down!
— T20 World Cup (@T20WorldCup) November 7, 2021
Zazai gets a leading edge with Boult celebrating the wicket. #T20WorldCup | #NZvAFG | https://t.co/paShoZpj88 pic.twitter.com/1lWseJjfN5
हझ्रतुल्लाह झझाई नाबाद २ धावा आणि रहमानुल्लाह गुरबाज नाबाद ४ धावा
मोहम्मद शहजाद ४ धावा करून बाद झाला. एडम मिलनेच्या गोलंदाजीवर डेवॉन कॉनवेने त्याचा झेल घेतला.
Gone ☝️
— T20 World Cup (@T20WorldCup) November 7, 2021
Milne strikes as Conway takes a good catch with Shahzad walking back for 4. #T20WorldCup | #NZvAFG | https://t.co/paShoZpj88
मोहम्मद शहजाद ४ धावा आणि हझ्रतुल्लाह झझाई १ धाव
मोहम्मद शहजाद ४ धावा आणि हझ्रतुल्लाह झझाई १ धाव
अफगाणिस्तान न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मुजीबला संघात स्थान दिलं आहे.
? in the playing XI ?
— ICC (@ICC) November 7, 2021
How big an impact will Mujeeb Ur Rahman have in the contest in Abu Dhabi?#T20WorldCup | #NZvAFG | https://t.co/oXtbojeRda pic.twitter.com/haqBEb4Ypc
न्यूझीलंडचा संघ- मार्टिन गुप्टिल, डेरिल मिशेल, केन विलियमसन, डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिशेल सॅन्टनर, एडम मिलने, टीम साउथी, इश सोढी, ट्रेन्ट बोल्ट
अफगाणिस्तानचा संघ- हझ्रतुल्लाह झझाई, मोहम्मद शहजाद, रहमनुल्लाह गुरबाज, नजीबुल्लाह झाद्रन, मोहम्मन नबी, गुलबदीन नइब, करिम जनत, राशीद खान, नवीन उल हक, हमिद हसन, मुजीब उर रहमान
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Toss update from Abu Dhabi ?
— ICC (@ICC) November 7, 2021
Afghanistan have won the toss and elected to bat.
Who are you backing in this one?#T20WorldCup | #NZvAFG | https://t.co/oXtbojeRda pic.twitter.com/cEFSM7LhCu
The eyes of the world will be on Abu Dhabi, with #NewZealand’s #T20WorldCup meeting with #Afghanistan also bearing huge significance on India’s campaign ?
— T20 World Cup (@T20WorldCup) November 7, 2021
How #NZvAFG shifts the semi-final race ?https://t.co/y8TXNRnZTl