आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ मध्ये आज शारजाह क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने श्रीलंका संघाला १६४ धावांचे लक्ष्य दिले. संघाच्या वतीने जोस बटलरने मागील सामन्याप्रमाणेच तुफानी शैलीत फलंदाजी करताना नाबाद १०१ धावांची खेळी केली. स्पर्धेतील हे पहिलेच शतक ठरले. कर्णधार इऑन मॉर्गनने ४० धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून फिरकीपटू वानिंदू हसरंगाने तीन, तर दुष्मंथा चमीराने एक विकेट घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील सामन्याप्रमाणे जोस बटलरने आपला फॉर्म कायम राखत इंग्लंडच्या डावाला सुरुवात केली. त्याचा साथीदार जेसन रॉय लवकर तंबूत परतला. डेव्हिड मलान आणि जॉनी बेअरस्टोही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यानंतर कप्तान ईऑन मॉर्गनसोबत बटलरने किल्ला लढवला. या दोघांनी आक्रमक शतकी भागीदारी उभारली. १९व्या षटकात मॉर्गन (४०) माघारी परतला. शेवटच्या षटकात बटलरला शतकायासाठी १३ धावांची आवश्यकता होती.

हेही वाचा – PHOTOS : श्रीशांतसह ‘या’ पाच क्रिकेटपटूंनी गाजवलंय बिग बॉसचं मैदान; एक होता ‘विदेशी’!

शेवटचे षटक…

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुश्मंता चमीराने शेवटचे षटक टाकले. बटलरने पहिल्याच चेंडूवर त्याला चौकार ठोकला. पुढच्या दोन चेंडूंलर बटलरने प्रत्येकी दोन धावा घेतल्या. चौथा-पाचवा चेंडू चमीराने निर्धाव खेळवला. शेवटच्या चेंडूवर बटलरला शतकासाठी ५ धावांची गरज होती, त्याने चमीराला उत्तुंग षटकार ठोकत आपले शतक साजरे केले. बटलरने ६७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १०१ धावा केल्या. त्याचे हे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील पहिलेवहिले शतक ठरले.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील जॉस बटलरच्या सर्वाधिक धावा

  • १०१* वि. श्रीलंका, २०२१
  • ८३* वि. भारत, २०२१
  • ७७* वि. ऑस्ट्रेलिया, २०२०
  • ७२* वि. श्रीलंका, २०१६
  • ७१* वि. ऑस्ट्रेलिया, २०२१

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 wc eng vs sl jos buttler brings up his maiden century on last ball of innings adn
First published on: 01-11-2021 at 21:55 IST