विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेसाठी उज्ज्वल भवितव्य लाभलेला संघ म्हणून नवोदित अफगाणिस्तानकडे पाहिले जात आहे. १९९५मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट महासंघाची स्थापना झाली. (हल्लीचे अफगाणिस्तान क्रिकेट मंडळ) २००१मध्ये आयसीसीचे सदस्यत्व त्यांना मिळाले. त्याच वर्षी त्यांच्या राष्ट्रीय संघाची
मे २००८मध्ये आयसीसी जागतिक क्रिकेट लीग स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत अफगाणिस्तानने २०१०मध्ये झालेल्या आयसीसी ट्वेन्टी-२० स्पर्धेत स्थान मिळवले. त्यांची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. त्याच वर्षी त्यांनी आंतरखंडीय स्पर्धेत विजेतेपद मिळवताना अंतिम फेरीत स्कॉटलंडला पराभवाचा धक्का दिला हो
बलस्थान व कच्चे दुवे
अफगाणिस्तान म्हटले की सतत आपल्यासमोर युद्धाचेच चित्र दिसते. सतत दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे कायमच दडपणाखाली राहणाऱ्या लोकांमध्ये क्रिकेटचे चांगले नैपुण्य आहे, हे पाकिस्तानचे माजी खेळाडू कबीर खान यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी अनुभवी व युवा खेळांडूबरोबरच अष्टपैलू खेळाडूंचा संघात समावेश असेल यावर भर दिला आहे. त्यामुळेच त्यांचा संघ समतोल मानला जात आहे. कर्णधार मोहम्मद नबी, समीउल्ला शेनवारी, नवरोझ मंगल यांच्याकडे आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. मोहम्मद नबी, समीउल्ला शेनवारी हे दोघेही अनुभवी अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे संघाची मुख्य मदार त्यांच्यावर आहे. मात्र अफगाणिस्तानची ही पहिलीच विश्वचषकाची मुख्य स्पर्धा असल्यामुळे त्यांच्यावर मानसिक दडपण राहणार आहे. तसेच अव्वल दर्जाच्या संघांशी खेळण्याचा फारसा अनुभव नाही ही आणखी एक समस्या त्यांच्यापुढे असणार आहे.
अपेक्षित कामगिरी
या स्पर्धेत पदार्पण करीत असल्यामुळे साखळी गटापुरतेच त्यांचे आव्हान राहणार आहे. स्कॉटलंड व बांगलादेश यांच्याविरुद्ध ते विजय मिळवू शकतील; मात्र त्यासाठी त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. अन्य संघांविरुद्ध त्यांचा निभाव लागणे कठीण आहे.
संकलन : मिलिंद ढमढेरे