फलंदाजाला नामोहरम करणारा ‘बाऊन्सर’ हे खरंतर कसोटी क्रिकेटमधील गोलदांजाचे हुकमी अस्त्र. बाउन्सरच्या माऱ्यातून कशीबशी स्वत:ची सुटका करून सावरत असलेल्या फलंदाजाकडे आव्हानात्मक नजेरेने पाहणारा गोलंदाज, असे चित्र अनेकदा पाहायला मिळते. पण गुरुवारी अॅडलेडवरील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल जॉन्सनचा एक उसळता चेंडू भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या हेल्मेटवर आदळला आणि सारेच स्तब्ध झाले. जॉन्सनसह सारेच ऑस्ट्रेलियन खेळाडू कोहलीच्या दिशेने धावले. त्यांच्या नजरेत आव्हान किंवा टेहाळणी नव्हती. तर भीती होती आणि स्मृती होत्या.. फिल ह्य़ुजच्या हेल्मेटवर आदळलेल्या चेंडूची.
मुरली विजय ३१व्या षटकामध्ये बाद झाल्यावर विराट फलंदाजीला आला. आणि मिचेल जॉन्सनचा पहिलाच चेंडू उसळून त्याच्या हेल्मेटवर आदळला. धक्क्यातून सावरलेला विराट हेल्मेट काढून तपासत असतानाच ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार मायकेल क्लार्कसह अन्य खेळाडू कोहलीकडे धावले आणि त्याची चौकशी केली. जॉन्सन तर काही क्षण स्तब्धच झाला होता. ‘बाऊन्सर’ आदळूनही कोहली निश्चलपणे उभा होता. पण ऑस्ट्रेलियन खेळाडूच अधिक भावूक झालेले दिसले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2014 रोजी प्रकाशित
एक चेंडू उसळला, अन् ..
फलंदाजाला नामोहरम करणारा ‘बाऊन्सर’ हे खरंतर कसोटी क्रिकेटमधील गोलदांजाचे हुकमी अस्त्र. बाउन्सरच्या माऱ्यातून कशीबशी स्वत:ची सुटका करून सावरत असलेल्या फलंदाजाकडे आव्हानात्मक नजेरेने पाहणारा गोलंदाज, असे चित्र अनेकदा पाहायला मिळते.

First published on: 12-12-2014 at 06:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The terrifying bouncer hits virat kohli helmet