IND vs AUS Semi Final Score Updates: वरूण चक्रवर्तीने चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल सामन्यात कमाल केली आहे. भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यांमध्ये कायम भारताची डोकेदुखी ठरणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला त्याने येताच दुसऱ्या चेंडूवर झेलबाद केलं. ट्रॅव्हिस हेडला शुबमन गिलने झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये धाडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रॅव्हिस हेड वरुणचा कमालीचा चेंडू समजू शकला नही. ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन त्याने चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू टाईम झाला नाही आणि चेंडू हवेत गेला, शुबमन गिलने लाँग ऑफवर एक सोपा शानदार घेतला आणि भारताच्या सर्वात मोठ्या डोकेदुखीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

याआधी मोहम्मद शमीच्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला जीवदान मिळाले होते. मात्र वरुणच्या चेंडूतून हेड सुटू शकला नाही. सामन्यातील त्याच्या दुसऱ्या चेंडूवर वरुणने हेडला आपल्या जाळ्यात अडकवले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील नववे षटक वरुणने टाकले. हेडला त्याच्या दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा होता. हेडने वरुणचा चेंडू हवेत फेकला पण तो शुबमन गिलने झेलबाद केल्याने हेडचा डाव संपुष्टात आला. हेड ३३ चेंडूत ३९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

ट्रॅव्हिस हेडला ३ वेळा मिळालं जीवदान

सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला जीवदान मिळाले पण त्याचा जास्त काळ फायदा उठवता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या डावातील पहिलं षटक मोहम्मद शमीने टाकले. शमीच्या पहिल्याच चेंडूवर हेडने समोरच्या दिशेने एक फटका खेळला आणि शमीने तो पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हातातून चेंडू सुटला.

शमीने हा झेल टिपला असता तर पहिल्याच चेंडूवर हेड माघारी परतला असता. याशिवाय हेड नंतर जडेजाच्या थ्रोवर धावबाद होण्यापासून वाचला. थेट थ्रो लागला असता तर हेड बाद झाला असता. यानंतर चेंडूची कड घेतलेला चेंडू थोडक्यात स्टंपवर लागल्यापासून वाचला आणि चौकार गेला पण वरूणच्या गोलंदाजीवर हेड नशीबवान ठरला नाही आणि भारताला विकेट मिळाली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travis head wicket varun chakarvarthy bowling and shubman gill took brilliant catch ind vs aus watch video bdg