स्टार स्पोर्ट्स प्रो कबड्डी लीगमधील पाटणा पायरेट्सचा विजयी अश्वमेध त्यांच्या घरच्या मैदानावर रोखण्याची किमया गतविजेत्या यु मुंबाने साधली आणि पाटण्यावर ३४-२८ असा विजय मिळवला. अन्य एका रोमहर्षक लढतीत बाजीराव होडगेच्या नेत्रदीपक पकडी आणि जँग कुन लीच्या चढायांच्या जोरावर बंगाल वॉरियर्सने तेलुगू टायटन्सला ३२-२८ असे पराभूत केले.
मुंबाने पाचव्याच मिनिटाला पाटण्यावर पहिला लोण चढवत विजयाचा पाया रचला, त्यानंतर १६ मिनिटाला दुसरा लोण चढवत मध्यंतरापर्यंत २४-९ अशी दमदार आघाडी घेतली. पाटण्याच्या रोहित कुमारने जोरदार चढायांच्या जोरावर संघाला मुंबाच्या जवळ आणून ठेवले. पण इराणच्या हाडी ताजिकने त्याच्या दोनदा पकडी केल्या आणि पाटण्याकडून सामना निसटला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजचे सामने
जयपूर वि. बंगळुरू बुल्स
पुणेरी पलटण वि. दबंग दिल्ली
वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: U mumba beat patna pirates