जमेकाचा विश्वविक्रमी धावपटू युसेन बोल्ट याने जागतिक मैदानी स्पर्धेत दुहेरी मुकूटाच्या दिशेने वाटचाल केली आहे. शंभर मीटर धावण्याची शर्यत जिंकणाऱ्या या खेळाडूने दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरी गाठली.
बोल्ट याने दोनशे मीटर अंतराच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत अग्रस्थान घेतले. त्याने हे अंतर २०.१२ सेकंदात पार केले. त्याच्या पाठोपाठ अॅनसो जोबादावाना (दक्षिण आफ्रिका) याने हे अंतर २०.१३ सेकंदात पार करीत दुसऱ्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली. पहिल्या उपांत्य फेरीत अमेरिकेचा कुर्टीस मिशेल (१९.९७ सेकंद), जमेकाचा वॉरेन विअेर (२०.२० सेकंद), नॉर्वेचा जेयुसमा सैदी नूर (२०.३३ सेकंद) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवित अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतील तिसऱ्या शर्यतीत इंग्लंडच्या अॅडम जेमिली (१९.९८ सेकंद) याने अग्रक्रमांकाने अंतिम फेरीचे पात्रता निकष पूर्ण केले. त्याच्या पाठोपाठ जमेकाचा निकेल अॅशमेड (२० सेकंद) व नेदरलँड्सचा चुरांडी मार्टिन (२०.१३ सेकंद) यांनी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाने अंतिम फेरीत प्रवेश केला. बोल्ट याने लंडन ऑलिम्पिकमध्ये शंभर व दोनशे मीटर धावणे या दोन्ही शर्यतींमध्ये सोनेरी कामगिरी करीत डबल धमाका केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 17th Aug 2013 रोजी प्रकाशित
विश्व अजिंक्यपद अॅथलेटीक्स स्पर्धा : दोनशे मीटर धावण्यात बोल्ट अंतिम फेरीत
जमेकाचा विश्वविक्रमी धावपटू युसेन बोल्ट याने जागतिक मैदानी स्पर्धेत दुहेरी मुकूटाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
First published on: 17-08-2013 at 05:02 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usain bolt enters 200m final at world athletics championship