‘वेगाचा बादशहा’ उसेन बोल्टला यंदाच्या हंगामात अद्याप सूर गवसलेला नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी बोल्ट पात्र ठरला असला तरी कामगिरीत सातत्य आणण्यासाठी बोल्ट जमैका शर्यतीत सहभागी होणार आहे. १०० मीटर आणि २०० मीटर प्रकारात विश्वविक्रम नावावर असणाऱ्या बोल्टला सध्या पायाच्या आणि मांडीच्या स्नायूच्या दुखापतीने सतावले आहे. जमैका शर्यतीत बोल्टला असाफा पॉवेल आणि योहान ब्लेक यांचे आव्हान आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या न्यूयॉर्क डायमंड लीग शर्यतीत बोल्टने २०.२९ सेकंदांची वेळ नोंदवली होती. तंदुरुस्ती आणि सातत्य कमावण्यासाठी जमैका शर्यतीत सहभागी व्हावे लागेल असे बोल्ट म्हणाला होता.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jun 2015 रोजी प्रकाशित
बोल्ट जमैका शर्यतीत खेळणार
‘वेगाचा बादशहा’ उसेन बोल्टला यंदाच्या हंगामात अद्याप सूर गवसलेला नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी बोल्ट पात्र ठरला

First published on: 22-06-2015 at 02:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usain bolt to run at jamaica trials