ट्वेन्टी-२० स्पर्धा म्हटलं की फलंदाजीचे जोरकस फटके, गोलंदाजीची जादू आणि क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहण्याची संधी असते. वीस षटकांच्या सामन्यात आपण आजवर अनेक अफलातून क्षेत्ररक्षणाचे क्षण अनुभवले आहेत. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत आयर्लंड विरुद्ध ओमान या सामन्यात मातब्बर संघांनी दखल घेण्यासारखा क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहायला मिळाला. आयर्लंडच्या ग्रे विल्सनने सीमारेषेवर योग्य वेळी झेप घेऊन चेंडू उत्तमरित्या सीमा रेषेच्या बाहेर जाणारा चेंडू अडवला आणि संघासाठी षटकार रोखला. विल्सनने आपल्या क्षेत्ररक्षणाने पात्रता फेरीसाठी झगडणाऱया संघांचाही दर्जा आता उंचावल्याचे दाखवून दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video gary wilsons amazing effort to save a six