ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बॉक्सर विजेंदरसिंग याच्यावर पंजाब पोलिसांनी अमली पदार्थ सेवनाबद्दल केलेले गंभीर आरोप लक्षात घेता त्याने रक्त व केसांची वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे, असा सल्ला त्याचे प्रशिक्षक जी. एस. संधू यांनी केला आहे.
विजेंदर याने रक्त व केसांची वैद्यकीय तपासणी करण्यास विरोध केला आहे. त्याबाबत संधू म्हणाले की, ‘‘विजेंदर याने पोलिसांना सहकार्य करीत आदर राखावा. पोलिसांनी यापूर्वीच विजेंदरचा सहकारी रामसिंग याच्या रक्ताचे व केसांचे नमुने घेतले आहेत. त्यामुळे विजेंदर यानेही ही चाचणी करून घ्यावी म्हणजे त्याच्यावरील आरोपांची शहानिशा होईल.’’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijendra should face the medical test sindhu