करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे.

VIDEO : ‘शीला की जवानी’नंतर डेव्हिड वॉर्नरचा सहकुटुंब भन्नाट डान्स

करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी सर्व क्रिकेटपटू लाईव्ह चॅटचा आधार घेत आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स यांनी लाईव्ह चॅटमार्फत एकमेकांशी आणि चाहत्यांशी संवाद साधला. यात बोलता-बोलता विराटने डीव्हिलियर्सला काही व्हिडीओज बघायला सांगितल्या.

IPL : ‘मुंबई इंडियन्स’च्या पहिल्याच सामन्यात सचिन होता संघाबाहेर, कारण…

नक्की काय घडलं प्रकरण?

लाईव्ह चॅट सुरू असताना…

डीव्हिलियर्स – अरे देवा… तो चहल खूपच वेडा माणूस आहे. तो मला रात्री १ वाजता वगैरे फोन करतो.

विराट – अरे, तू जा आणि त्याचे टीक-टॉक व्हिडीओ बघ. तुझा विश्वासच बसणार नाही की हा माणूस २९ वर्षांचा आहे आणि तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. तो खरंच विदुषक (विनोदी स्वभावाचा) आहे.

सचिनच्या ‘स्ट्रेट ड्राईव्ह’वरून मुंबई पोलिसांचं हटके ट्विट

दरम्यान, भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल मात्र सध्या वेगळ्याच विश्वात आहे. क्रिकेट स्पर्धा बंद असल्याने गेले काही दिवस चहल टिकटॉक वर बराच अ‍ॅक्टिव्ह असल्याचे दिसत आहे. आधी तो एकटा व्हिडीओ बनवायचा, पण नंतर मात्र आपल्या कुटुंबासोबत टिक-टॉक व्हिडीओ बनवताना तो दिसतो आहे.

त्या व्हिडीओवरून तो खूप ट्रोलदेखील होत आहे.