झुरिच चेस चॅलेंज बुद्धिबळ स्पध्रेत भारताच्या विश्वनाथन आनंदला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र जिब्राल्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पध्रेतील खराब कामगिरीनंतर झुरिच येथील स्पध्रेत आनंद सावरल्याचे दिसून आले.
अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने आनंदपेक्षा वरचढ ठरत विजेतेपदाला गवसणी घातला. गेल्या वर्षीसुद्धा आनंद जर्मनीमधील ग्रेंके क्लासिक स्पध्रेतील खराब कामगिरीनंतर झुरिचला आला होता व क्लासिकल प्रकारात विजेता झाला होता.
आनंदने क्लासिकल-रॅपिड प्रकारात ७ गुण मिळवले, तर ब्लिट्झ प्रकारात ३.५ गुण मिळवून एकंदर गुणसंख्या १०.५पर्यंत वाढवली. नाकामुराच्या खात्यावरही तितकेच गुण जमा होते. रशियाच्या व्लादिमिर क्रामनिकला ९.५ गुणांसह तिसरे स्थान मिळवले.
अंतिम निकाल
१-२ : हिकारू नाकामुरा (अमेरिका), विश्वनाथन आनंद (भारत) – १०.५ गुण प्रत्येकी
३ : व्लादिमिर क्रामनिक (रशिया)
– ९.५ गुण
४-५ : अनिश गिरी (नेदरलँड्स), लेव्हॉन अरोनियन (अर्मेनिया) – ५.५ गुण प्रत्येकी
६ : अॅलेक्सी शिरॉव्ह (लॅटव्हिया) – ३.५ गुण
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2016 रोजी प्रकाशित
झुरिच चेस चॅलेंज बुद्धिबळ स्पर्धा : आनंदला दुसरे स्थान
झुरिच चेस चॅलेंज बुद्धिबळ स्पध्रेत भारताच्या विश्वनाथन आनंदला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

First published on: 17-02-2016 at 05:51 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viswanathan anand finishes second in zurich chess challenge