Wasim Khan On Imran Khan: पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने माजी कर्णधार इम्रान खानबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. वसीम अक्रम इमरान खानच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानकडून खेळला आहे. ‘स्विंगचा सुलतान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसीमने इम्रान खानचं वर्णन जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून केलं आहे, जो त्याच्या मते कपिल देवपेक्षाही चांगला होता. त्याने इम्रान खानबद्दल केलेल्या
वसीमने स्टिक टू क्रिकेट पॉडकास्टवर इम्रान खानबाबत वक्तव्य केलं आहे. अक्रम इम्रान खानबद्दल जे बोलला आहे त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. अक्रमने इम्रान खानचे वर्णन प्रतिभावान खेळाडू नाही तर एक मेहनती क्रिकेटपटू म्हणून केलं आहे.
स्टिक टू क्रिकेट पॉडकास्टवर बोलताना अक्रम म्हणाला, “माझ्या क्रिकेट कारकिर्दीत मैदानात असो वा मैदानाबाहेर मी जे काही साध्य केलं त्याचं श्रेय मी त्यांना देतो. तो आम्हाला नेहमी आत्मविश्वास देत असे. स्वतः पुढे होऊन नेतृत्व करायचा. त्याला त्यांच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास होता.
अक्रमने पुढे सांगितलं की, “लोक म्हणायचे की तो नैसर्गिकरित्या प्रतिभावान होता. पण माझ्या नजरेत इम्रान प्रतिभावान नव्हता, त्याने खूप मेहनत केली होती. मला आठवतंय, त्याने स्वतःची गोलंदाजी अॅक्शन बदलला होता. एखाद्या गोलंदाजाला अगदी थोडंसं अॅक्शन बदलायलाही महिने लागू शकतात, कधी कधी ते बदल करणं जमतही नाही. पण इम्रानने गोलंदाजी अॅक्शन बदलली. तो एवढा जिद्दी होता.”
अक्रमने पुढे ठामपणे सांगितलं की, इम्रानची चिकाटी आणि नवीन शिकण्याची तयारी संपूर्ण संघासाठी एक आदर्श ठरली. अक्रमच्या म्हणाला, “कधी कधी तो आमच्यावर ओरडायचा, कारण समोरचा जर आळशी असेल तर ते त्याला मान्य नव्हतं. तो मैदानावर खूप कठोर होता. त्याची एकच अट होती, तू शंभर टक्के दे. जर तुझ्याकडून चांगलं झालं नाही तर काही हरकत नव्हती.” अक्रमने इम्रान खानला आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट ऑलराउंडर असंही संबोधलं.