जगभरात सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहेत आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. घरबसल्या काही क्रिकेटपटू पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत, तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करणारे क्रिकेटपटू लक्ष वेधून घेत आहेत. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपूट डेव्हिड वॉर्नर त्यात आघाडीवर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

…तेव्हा वाटलं ‘सोशल डिस्टन्सिंग’ गेलं खड्ड्यात – सचिन तेंडुलकर

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गाण्यावर डान्स करतानाचा त्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओत त्याने लेकीसोबत ‘शीला की जवानी’ गाण्यावर डान्स केला. त्यानंतर वॉर्नरने त्याची मुलगी, त्याचं छोटं बाळ, तो स्वत: आणि पत्नी कँडी असे सारेच जण डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर ‘साऊथ स्टार’ अल्लू अर्जूनच्या गाण्यावर ही श्री व सौ वॉर्नर थिरकताना दिसले. त्यानंतर आता वॉर्नर एक नवा व्हिडीओ घेऊन आला आहे.

ना धोनी, ना युवराज, ना गंभीर… या खेळाडूमुळे जिंकलो विश्वचषक – सुरेश रैना

वॉर्नरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात वॉर्नरच्या हातात चहाचा कप आहे. चहा गरम असल्याने तो दोन हातांचा समतोल साधून चहाचा कप पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. तसेच त्यानंतर तो चहाचा घोट पिऊन विचित्र हावभाव करतानाही दिसतो आहे. हे सारं वॉर्नर एका म्यूझीकच्या लयीवर करताना दिसतो आहे. असंच किंवा यापेक्षाही चांगल्या प्रकारे तू असं करू शकतोस का ते दाखव, असं आव्हान त्याने सहकारी खेळाडू अरॉन फिंचला दिले आहे.

“धोनीलाच क्रिकेटपासून दूर राहायचं होतं”; माजी निवडकर्त्यांचे स्पष्टीकरण

याआधी, डेव्हिड वॉर्नरने दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीवर असलेलं प्रेम दाखवून दिलं होतं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील स्टार अल्लू अर्जुन याच्या एका चित्रपटातील गाण्यावर डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी कँडी यांनी रोमँटिक डान्स केला होता. अल्लू अर्जुनच्या बुट्टाबोम्मा या गाण्यावर त्यांनी डान्स केला होता. त्या व्हिडीओनंतर अल्लू अर्जूननेदेखील त्याचे आभार मानले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch david warner challenges aaron finch in new tiktok video ask thoughts for cricketers vjb