न्यूझीलंड दौऱ्यात विश्रांती घेतलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुनरागमन केलं आहे. पहिल्या सामन्यात विराटला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. काही दिवसांपूर्वी विराट आपला बॉडीगार्ड फैजल खानच्या बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला होता. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

विराटने मोठ्या उत्साहात फैजलच्या वाढदिवसाचा केक कापण्यामध्ये सहभाग नोंदवला. यानंतर त्याने फैजलला एक खास गिफ्टही दिलं. विराटकडून मिळालेलं गिफ्ट पाहिल्यानंतर फैजलही चांगलाच आनंदात दिसत होता. बुधवारी भारत बंगळुरुच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी-20 सामना खेळणार आहे.