What is Rest Day in Test Match SL vs NZ: श्रीलंका आणि न्यूझीलंड या देशांमध्ये सप्टेंबरमध्ये कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. कोलंबो येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांतीचा दिवस ठेवण्यात आला आहे. १५ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये विश्रांतीचा दिवस परतला आहे. पूर्वीच्या कसोटी सामन्यांमध्ये हा विश्रांतीचा दिवस होता. पण हा विश्रांतीचा दिवस नेमका काय आहे? जाणून घ्या.
हेही वाचा – ENG vs SL: इंग्लंडच्या कसोटी संघात भारताच्या माजी खेळाडूचा लेक, अचानक कशी मिळाली संधी?
SL vs NZ कसोटी सामना सहा दिवस असणार
श्रीलंका वि न्यूझीलंड कसोटी सामन्यात एका दिवसाच्या सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. यामागचं कारण म्हणजे निवडणुका. २१ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. या कारणास्तव, १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये २१ सप्टेंबरला विश्रांतीचा दिवस असेल. म्हणजेच या दिवशी सामना होणार नाही. जवळपास १६ वर्षांनंतर कसोटी सामन्यात विश्रांताचा दिवस पुन्हा ठेवण्यात आला आहे़. यापूर्वी २००८ मध्ये विश्रांतीचा दिवस ठेवण्यात आला होता. २००१ नंतर श्रीलंकेतील हा पहिला विश्रांतीचा दिवस असेल. २३ वर्षांनंतर श्रीलंकेत पहिल्यांदाच एखाद्या सामन्यात विश्रांतीचा दिवस असेल. २००१ मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात विश्रांतीचा दिवस असलेली कसोटी खेळली गेली. श्रीलंकेत पौर्णिमेच्या निमित्ताने साजरा होणाऱ्या पोया दिवसामुळे विश्रांतीचा दिवस ठेवण्यात आला.
विश्रांतीचा दिवस असल्याने न्यूझीलंड-श्रीलंका कसोटी सामना ६ दिवसांचा असेल. मात्र, सामान्य कसोटीप्रमाणे खेळाडूंना केवळ ५ दिवस खेळता येणार आहे. ही कसोटी १८ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर दरम्यान ६ दिवसात खेळवली जाईल. सुट्टीमुळे एक दिवस जादा करण्यात आला आहे. सहसा विश्रांतीचा दिवस पूर्वी रविवारी ठेवला जात असे, परंतु आधुनिक क्रिकेटमध्ये तो कोणत्याही दिवशी ठेवला जातो. मात्र, उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना केवळ पाच दिवसच चालणार आहे. विश्रांती दिवसासह सर्वात अलीकडील कसोटी सामना २००८ मध्ये ढाका येथे श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. सुरूवातीच्या सामन्यात, संसदीय निवडणुकांमुळे २९ डिसेंबर हा विश्रांतीचा दिवस घोषित करण्यात आला.
विश्रांतीचा दिवस म्हणजे काय? (What is Rest Day?)
१९व्या-२०व्या शतकात विश्रांतीचा दिवस हा कसोटी क्रिकेटचा नियमित भाग होता. इंग्लंडमध्ये खेळले गेलेले अनेक कसोटी सामने ६ दिवसांच्या कालावधीत खेळवले गेले. रविवार हा कसोटी सामन्यांमध्ये विश्रांतीचा दिवस होता, या दिवशी सामना खेळला गेला नाही. विश्रांतीचा दिवस म्हणजे सुट्टीचा अर्थ साधारणपणे इंग्लंडमध्ये रविवारी चर्चला जाण्याची प्रथा होती.
© IE Online Media Services (P) Ltd