Mumbai Shardul Thakur took 6 wickets for 21 runs against Assam : भारताचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकूरने रणजी सामन्यांमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. आजपासून (शुक्रवार) सुरू झालेल्या आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात शार्दुल मुंबईकडून खेळत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने दमदार गोलंदाजी केली आणि अवघ्या २१ धावांत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या दमदार गोलंदाजीमुळे मुंबईने आसामला पहिल्या डावात अवघ्या ८४ धावांत गुंडाळले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएलपूर्वी शार्दुलची ही गोलंदाजी खूप महत्त्वाची आहे. वास्तविक, गेल्या काही सामन्यांत तो लयीत दिसला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पण त्याला काही खास करता आले नव्हते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीतही त्याला एकच विकेट घेता आली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील दुसऱ्या कसोटीत त्याला संधी मिळाली नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही तो बाहेर आहे. यानंतर शार्दुलने रणजी सामने खेळून आपला फॉर्म शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

छत्तीसगडविरुद्धच्या शेवटच्या रणजी सामन्यात शार्दुलला गोलंदाजीने प्रभावित करता आले नव्हते. त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. मात्र आता त्याने आसामविरुद्ध शानदार गोलंदाजी करत फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दाखवले आहेत. त्याच्या या कामगिरीवर चेन्नई सुपर किंग्जही खूप खूश असेल. यावेळी शार्दुल आयपीएलमध्ये सीएसके संघाचा सदस्य आहे. याआधी तो चेन्नईकडून आयपीएलही खेळला आहे.

हेही वाचा – IND vs ENG : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! कसोटीत ५०० विकेट्स घेणारा भारताचा दुसरा आणि जगातील नववा गोलंदाज ठरला

शार्दुलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

शार्दुल ठाकूरने ऑगस्ट २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने ११ कसोटी, ४७ एकदिवसीय आणि २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १२९ विकेट्स आहेत. फलंदाजीतही तो प्रभावी ठरला आहे. त्याच्या खात्यात ७०० हून अधिक धावांची नोंद आहे. शार्दुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ अर्धशतके झळकावली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While bowling for mumbai shardul thakur took 6 wickets for 21 runs against assam in ranji trophy 2025 vbm