वर्षांतील पहिल्याच शर्यतीत दिग्गज प्रतिस्पर्ध्यावर सरशी साधत लोटसचा ड्रायव्हर किमी रायकोनेन याने ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. शर्यतीचे जेतेपद पटकावत फॉर्म्युला-वन मोसमाचा श्रीगणेशा केला.
सातव्या क्रमांकावरून सुरुवात करत रायकोनेनने सुरेख कामगिरी करून फेरारीचा फर्नाडो अलोन्सो आणि रेड बुलचा विश्वविजेता ड्रायव्हर सेबॅस्टियन वेटेल यांचे आव्हान मोडीत काढत जेतेपदावर नाव कोरले. रायकोनेनचे हे कारकीर्दीतील २०वे तर ऑस्ट्रेलियन शर्यतीचे दुसरे जेतेपद ठरले. अखेरच्या लॅपमध्ये मुसंडी मारत रायकोनेनने १ तास ४४ मिनिटे ६५७ सेकंदांसह ही शर्यत जिंकली. टायर बदलण्यासाठी त्याला पिट-स्टॉपमध्ये फक्त दोन वेळाच थांबावे लागले.
कौन कितने पानी में!
अलोन्सो आणि वेटेल यांना अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. फेरारीचा फेलिपे मासा चौथा तर मॅकलॅरेन संघाला सोडचिठ्ठी देऊन मर्सिडिझ संघात दाखल झालेला लुइस हॅमिल्टन पाचवा आला. रेड बुलच्या मार्क वेबरने सहावे स्थान पटकावले.  
फोर्स इंडियाला दहा गुण
सहारा फोर्स इंडिया संघाने मोसमातील पहिल्याच शर्यतीत शानदार कामगिरीची नोंद केली. एड्रियन सुटीलने सातवे तर पॉल डी रेस्टाने आठवे स्थान प्राप्त करून फोर्स इंडियाला १० गुणांची कमाई करून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मोसमात मला चांगली कार मिळाली आहे. पुढील टायर अखेपर्यंत टिकल्यास, कमीत कमी वेळा पिट-स्टॉपमध्ये जावे लागेल, हे माहीत होते. याच रणनीतीद्वारे कार चालवत अखेर बाजी मारली.
– किमी रायकोनन,     लोटसचा ड्रायव्हर

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wining start of kimi raikkonen