WPL 2023 GGW vs DCW Match Updates: महिला प्रीमियर लीग २०२३ मधील १४वा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात खेळला जात आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यानुसार गुजरात जायंट्स संघाने ४ बाद १४७ धावा केल्या. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स समोर १४८ धावांचे लक्ष्य ठेवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात जायंट्सची सुरुवात खराब झाली. संघाला पहिला धक्का सोफिया डंकलेच्या बाद होण्याने बसला. ती पहिल्याच षटकात ४ धावां काढून बाद झाली. त्यानंतर हरलीन देओल आणि लॉरा वोल्वार्डने आपल्या संघाचा डाव सावरला. त्याचबरोबर दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर हरलीन देओल बाद झाली. तिने ३१(३३) धावांचे योगदान दिले.

वोल्वार्ड-गार्डनरचे शानदार अर्धशतक –

यानंतर अॅशले गार्डनरने वोल्वार्डसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. अरुंधती रेड्डीने ही भागीदारी तोडली. तिने वोल्वार्डला बोल्ड केले. लीगमधील तिच्या दुसऱ्याच सामन्यात वोल्वार्डने अर्धशतक झळकावले. ४५ चेंडूत ५७ धावा करून ती बाद झाली. या खेळीत तिने सहा चौकार आणि एक षटकार लगावला. नुकत्याच झालेल्या महिला टी-२० विश्वचषकात वोल्वार्ड सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. तिच्याशिवाय अॅश्ले गार्डनरनेही तुफानी खेळी खेळली. गार्डनरने ३३ चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा केल्या. दिल्लीकडून जोनासेनने दोन विकेट घेतल्या क. त्याचवेळी मारिजाने कॅप आणि अरुंधती रेड्डी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, अॅलिस कॅप्सी, जेमिमा रॉड्रिग्ज, मारिजाने कॅप, जेस जोनासेन, तान्या भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, राधा यादव, शिखा पांडे, पूनम यादव.

हेही वाचा – IND vs AUS: वसीम जाफरने पहिल्या वनडेसाठी निवडली टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन, ‘या’ खेळाडूंना दिले स्थान

गुजरात जायंट्स: सोफिया डंकले, एल वोल्वार्ड, हरलीन देओल, अॅश्ले गार्डनर, दयालन हेमलता, स्नेह राणा (कर्णधार), सुषमा वर्मा (विकेटकीपर), किम गर्थ, तनुजा कंवर, मानसी जोशी, अश्विनी कुमारी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wpl 2023 ggw vs dcw gujarat giants target delhi capitals by 148 runs vbm