महिला प्रीमियर लीग (WPL) ही बीसीसीआयतर्फ आयोजित केलेली टी-२० स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात ४ मार्च रोजी होणार आहे. आयपीएलप्रमाणे महिलांसाठीही टी-२० लीग असावी या उद्देशाने WPL चे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात २०१८ मध्ये झाली होती. २०१८ च्या आयपीएलमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू दोन संघांमध्ये विभागून एक टी-२० सामना खेळण्यात आला. त्यानंतर २०१९, २०२० आणि २०२२ या वर्षांमध्ये आयपीएलमध्ये महिला क्रिकेटपटूंचे तीन सामने खेळवले गेले. पुढे आयपीएलप्रमाणे महिलांसाठीही टी-२० सामन्यांची लीग असावी असा प्रस्ताव मांडण्यात आला. फेब्रुवारी २०२२ मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महिला प्रीमियर लीगची घोषणा केली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात महिला क्रिकेटपटूंच्या लीगमध्ये पाच संघ असतील ही माहिती जाहीर करण्यात आली. त्यानुसार या लीगमध्ये दिल्ली, मुंबई, बंगलुरु, यूपी (उत्तर प्रदेश) आणि गुजरात या पाच संघांचा समावेश करण्यात आला. जानेवारी २०२३ मध्ये या WPLचा लिलाव पार पडला. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामामध्ये स्मृती मंधाना हिच्यासाठी सर्वाधिक बोली लावण्यात आली. ४ मार्च २०२३ रोजी या लीगमधील पहिला सामना नवी मुंबईमधील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. गुजरात आणि मुंबई हे दोन संघ या सामन्यामध्ये एकमेकांसमोर असणार आहेत. टाटा समूहाने महिला प्रीमियर लीगचे शीर्षक प्रायोजकत्व अधिकार प्राप्त केले आहेत.Read More
हुमेरा काझी हिने महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपल्या दर्जेदार खेळातून मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देण्यासाठी मोलाचं सहकार्य करून…
Harmanpreet Kaur Statement: महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने पहिले विजेतेपद पटकावले. त्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली, हा क्षण आमच्यासाठी खूप…
शफालीबाबत दिलेल्या निर्णयामुळे कॅप्टन लॅनिंग खूप निराश झाले. तिसऱ्या निर्णयानंतरही त्याने मैदानावरील पंचांशी बराच वेळ वाद घातला. शफालीला पॅव्हेलियनमध्ये परतावे…
WPL च्या पहिल्यावहिल्या हंगामात फलंदाजांनी लहान सीमारेषेचा पुरेपूर वापर करत चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आणि याबाबतीत मुंबईची कर्णधार हरमनप्रीतने खणखणीत उत्तर…
महिला प्रीमिअर लीगच्या एलिमिनीटर सामन्यात मुंबई इंडियन्सच्या इस्सी वोंगच्या भेदक हॅटट्रिकने यूपी वॉरिअर्सवर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्याच बरोबर…