भारताच्या युकी भांब्रीला एटीपी चॅलेंजर स्पध्रेच्या एकेरीत गाशा गुंडाळावा लागला असला तरी दुहेरीत त्याने अंतिम फेरीत धडक मारली आहे. एकेरीत युकीला अव्वल मानांकित राशियाच्या तेयमुराज गाबाश्वीलीकडून १-६, ३-६ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, दुहेरीत स्पेनचा सहकारी अॅड्रियन मेनेन्डीस-मर्कारियससह युकीने दुहेरीच्या उपान्त्य फेरीत एवगेनी डोन्स्कॉय आणि मॅथ्यु एबडेन या जोडीचा ३-६, ६-३, १०-७ असा पराभव केला.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2015 रोजी प्रकाशित
युकी दुहेरीच्या अंतिम फेरीत
भारताच्या युकी भांब्रीला एटीपी चॅलेंजर स्पध्रेच्या एकेरीत गाशा गुंडाळावा लागला असला तरी दुहेरीत त्याने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

First published on: 08-05-2015 at 12:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuki bhambri reaches doubles final of karshi challenger