क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरच्या घरी सालाबादप्रमाणे यंदाही बाप्पाचे आगमन झाले असून, मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सचिनच्या घरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी क्रीडा, मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी येतात. भारतीय संघाचा अष्टपैलू युवराज सिंग आणि द.आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स यांनी नुकतेच सचिनच्या घरी उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले. सचिनने युवराज आणि जॉन्टीसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
सचिनने सोमवारी वांद्रे येथील आपल्या निवासस्थानी गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली. गणेशपुजेचाही एक फोटो सचिनने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असतानाही सचिन वेळात वेळ काढून दरवर्षी आपल्या घरी बाप्पाचे मोठ्या थाटात आगमन करत असे. आता क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही सचिनने परंपरा कायम राखत बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले. सचिन आणि जॉन्टी हे दोघेही मातब्बर खेळाडू एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आयपीएलमध्ये दोघेही मुंबई इंडियन्स संघाचे मेन्टॉरम्हणून कार्यरत आहेत.
And then there were three 😉 #JontyRhodes @yuvisofficial
A photo posted by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on
A photo posted by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on
Happy #GaneshChaturthi to you and your family. Stay blessed 😊
A photo posted by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on