दीपा पाटील

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

४ उकडलेली अंडी, २ चमचे अख्खा गरम मसाला, १ चमचा गरम मसाला पूड, २ चमचे मिरचीपूड, ३ चमचे धनेपूड, अर्धा चमचा बडीशोप पूड, ३ बारीक चिरलेले कांदे, ४ टोमॅटो किसून, २ चमचे आले-लसूण पेस्ट, १ हिरवी मिरची, २ लाल मिरच्या, १ चमचा बेसन, कसुरी मेथी, ४ चमचे तेल

कृती

प्रथम अंडी उकडून घ्यावी. ती सोलून त्यांना टूथपिकच्या साहाय्याने टोचून घ्यावे. यानंतर ही अंडी तेलात लालसर तळून घ्यावीत. एका भांडय़ात तेल गरम करून आधी त्यात अख्खा गरम मसाला घालावा. नंतर बारीक चिरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट, टोमॅटो आणि मीठ घालून परतावे. यानंतर उरलेले सर्व मसाले, बेसन, कसुरी मेथी घालावी. या रश्शामध्ये शेवटी तळलेली अंडी घालून थोडा वेळ आचेवर ठेवावे. अंडा करी तयार.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Egg curry recipe egg gravy egg masala curry