या आसनामध्ये पायाची रचना गोमुखासारखी वाटते, त्यामुळे या आसनाला गोमुखासन म्हणतात. गुडघ्यांचा विकार असणाऱ्यांसाठी हे आसन लाभदायी आहे. गुडघे, पोटऱ्या, मांडय़ा, हाताचे स्नायू सुधारण्यास या आसनामुळे मदत होते.

कृती :

* सुरुवातीला जमिनीवर सुखासनात प्रथम बसावे.

* त्यानंतर डाव्या मांडीवर उजवी मांडी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

* नंतर डावा हात खालून वर व उजवा हात वरून खाली एकमेकांत गुंफून पकडण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत श्वसन संथ ठेवावे.

* जास्तीत जास्त वेळ या स्थितीत राहू असा प्रयत्न करावा.

* हे आसन दोन्ही बाजूने करावे. त्या वेळी उजवा हात खालून वर आणि डावा हात वरून खाली पाठीवर दोन्ही हात पकडण्याचा प्रयत्न करावा.