साहित्य

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०० मिली सोडा, २२५मिली आमरस, ५-६ पुदिन्याची पाने, १ हिरवी मिरची, १० ग्रॅम चाट मसाला, बर्फ.

कृती

पुदिन्याची पानं स्वच्छ धुऊन, बारीक चिरून घ्या. मिरचीचेही गोल आणि बारीक तुकडे करा. सोडा घ्या. त्यामध्ये आंब्याचा रस घाला आणि त्यात बर्फाचे खडे घालून ते एका जगामध्ये एकत्र करा. यातच चिरलेला पुदिना आणि मिरची घाला. ज्या ग्लासामध्ये तुम्ही हा मँगो टँगो पिणार आहात, त्यामध्ये हे मिश्रण ओता आणि वर थोडासा चाट मसाला भुरभुरा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mango tango mocktail recipe