खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूंच्या बळकटीसाठी हा व्यायाम महत्त्वाचा आहे. खांद्याच्या मागील बाजूस ‘पोस्टेरिअर डेल्टॉइड मसल’ हा स्नायू असतो. हा व्यायाम केल्याने हा स्नायू बळकट होतो.
कसे कराल?
* भिंतीकडे पाठ करून उभे राहा. मात्र भिंत आणि तुमच्यामधील अंतर किमान १० इंच असावे.
* हात पाठीमागे भिंतीवर टेकवा.
* आता खांद्याच्या मागील बाजूस असलेल्या स्नायूंचा वापर करत पाठ भिंतीच्या बाजूला न्या.
* पाठ भिंतीला टेकली तरी हरकत नाही. पाय मात्र आहे त्याच जागेवर पाहिजेत.
* असे किमान १० वेळा करा. काही दिवसांनी संख्या वाढवत न्या.
– डॉ. अभिजीत जोशी dr.abhijit@gmail.com