या आसनामध्ये दोन्ही हातांवर संपूर्ण शरीराचा भार येतो. हे आसन करण्यास थोडे अवघड असले तरी सरावाने आणि काळजीपूर्वक केल्यास जमू शकते. या आसनामुळे एकाग्रता वाढते. मनगट व हाताचे स्नायू बळकट होण्यासाठी उपयोगी. या आसनाचा सरावा काळजीपूर्वक आणि योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृती :

  • सरळ उभे राहा. आता कंबरेतून पुढे वाकावे.
  • दोन्ही हातांचे तळवे पावलांसमोर जमिनीवर टेकवावे.
  • त्यानंतर हळूहळू डावा गुडघा डाव्या काखेच्या व दंडाच्या आतल्या बाजूला टेकवावा.
  • हळूहळू हाताच्या तळव्यांवर संपूर्ण शरीराचे वजन पेलून पावले वर उचलावीत.
  • गुडघे ज्या स्थितीमध्ये आहेत, तसेच ठेवावेत. मान थोडी वरच्या दिशेला घ्यावी.
  • श्वसन संथगतीने सुरू ठेवावे. या स्थितीत काही वेळ स्थिर राहावे.
  • आसन सोडताना हळूहळू पावले जमिनीवर टेकवावी आणि पूर्वस्थितीत यावे.
मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga bakasana akp