घर अथवा जमीनजुमल्याच्या खरेदी-विक्रीची गुंतागुंतीची प्रक्रिया आणि कार्यपद्धती समजून घेतली तर रिअल इस्टेट क्षेत्रात करिअर करण्यासाठी पाऊल टाकता येऊ शकतं. ही बाब लक्षात घेऊनच मिटकॉन (महाराष्ट्र इंडस्ट्रिअल अॅण्ड टेक्निकल कन्सल्टन्सी ऑर्गनायझेशन) या संस्थेने अभ्यासक्रम सुरू केला आहे.
या संस्थेची स्थापना १९८२ साली एमआयडीसी, एमएसएसआयडीसी, सिकॉम या शासकीस संस्था आणि आयडीबीआय, आयसीआयसीआय आणि इतर बँकांच्या संयुक्त सहकार्याने झाली आहे. या संस्थेने ‘सर्टििफकेट कोर्स इन रिअल इस्टेट’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
या अभ्यासक्रमाचा कालावधी चार आठवडय़ांचा आहे. दहावी अथवा बारावी उत्तीर्ण कोणत्याही व्यक्तीला हा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमात रिअल इस्टेट (जमीनजुमला) व्यवस्थापन व हक्क, नोंदी, कर दायित्व, जमीनविषयक कामांच्या पद्धती, सातबारा, फेरफार, अकृषक जमिनी, तुकडा बंदी, गुंठेवारी, वतन व इमानी जमिनी, जमीन नोंदणीच्या पद्धती, मालमत्ता हस्तांतरण कायदे, लेआउट मंजुरी, बांधकाम टीडीआर, चटई क्षेत्र, सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी आणि हक्क, ओनरशिप फ्लॅट अॅक्ट, महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप अॅक्ट, मुद्रांक शुल्क आदी विषयांचं प्रशिक्षण दिलं जातं.
पत्ता- मिटकॉन उद्योग प्रबोधिनी,
कृषी महाविद्यालय आवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या शेजारी,
शिवाजी नगर, पुणे – ४१०००५.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2015 रोजी प्रकाशित
‘रिअल इस्टेट’ मधील संधी
शहरी, निमशहरी तसेच अलीकडे गावपातळीवरही ‘स्थावर मालमत्ता’ या क्षेत्रात नेहमीच उलाढाली होत असतात. हे लक्षात घेतल्यास करिअर आणि व्यवसाय करण्यासाठी या क्षेत्रात संधी उपलब्ध होऊ शकतात.
First published on: 01-04-2015 at 08:22 IST
मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career opportunities in real estate sector