फॅशन काळानुसार बदलत असते. आपल्या आवडी-निवडी, कम्फर्ट, सोय या सगळ्यातून आपण आपल्यासाठी जे निवडतो, तीच खरं तर स्टाईल! मार्केटमध्ये अनेक नवनवीन गोष्टी येत असतात. आपली स्वतची स्टाईल ठरविण्यासाठी हे सदर घेऊन येत आहे, मार्केट अपडेट्स! त्यातून तुमचा स्वतचा असा खास ‘स्टाईल फंडा’ ठरवा आणि व्हा ट्रेंडराईट!

पावसाळा म्हटलं की अनेकांचे खास पावसाळ्यासाठी म्हणून ठेवलेले, मळले तरी चालतील असे कपडे बाहेर येतात. ‘स्टाईल’ हा मुद्दा पावसाळ्यासाठी नाहीच असाही काही जणांचा समज असतो. मात्र पावसाळ्यातही ‘स्टाईल आयकॉन’ होणे ही काही फार कठीण गोष्ट नाही.

पावसाळ्यात नवलाईनं नटलेल्या निसर्गाबरोबरच रस्ताही रंगीबेरंगी छत्र्यांनी फुलून जातो. काही जण छत्र्या नाईलाजानं वापरतात. पण याच छत्रीची विचारपूर्वक निवड केली तर ती तुमची ओळख किंवा स्टाईल आयकॉन ठरू शकते. एथनिक, पार्टी, कॅज्युअल, कॉर्पोरेट अशा प्रत्येक लुकसाठी छत्र्या उपलब्ध आहेत. छत्र्यांचेही अनेक ब्रँड्स सध्या इन आहेत.

एथनिक लुकसाठी ‘द एलिफंट’ कंपनीच्या सुपरस्टायलिश छत्र्या मिळतात. यात मोर, हत्तीचे आकार, पारंपरिक नक्षी यांचा वापर या छत्र्यांवर केला जातो. लाल, निळा, पिवळा अशा व्हायब्रंट रंगात असणाऱ्या या छत्र्या पारंपरिक वेशभूषेवर खुलून दिसतात. कोणत्याही लुकवर वापरता येतील अशा सन ब्रँडच्या छत्र्यांचाही पर्याय आहे. प्लेन किंवा िपट्रेड स्वरूपात अनेक रंगांमध्ये या उपलब्ध आहेत. दोन, तीन, पाच फोल्ड आणि फोल्ड नसलेल्या छत्र्या यात मिळू शकतात. सध्या अनेक फॅशन अ‍ॅक्सेसरीजमध्ये ट्रेंड असलेला अँटिक लूक छत्र्यांमध्येही आहे. आजोबांच्या काळातील जुन्या छत्र्या नव्या स्वरूपात बाजारात दिसू लागल्या आहेत. एक किंवा दोन रंगात या छत्र्या आहेत. त्याशिवाय पोलका िपट्रच्या छत्र्याही ट्रेंडी लूक देऊ शकतात. पारदर्शक छत्रीचा टेंडही अजून टिकून आहे. हटके काही हवे असल्यास प्लेन छत्रीवर मधुबनी, वारली असे हँंड पेंटिंग, सुलेखन करून छत्रीला ‘पर्सनलाईज’ लूकही देता येईल. मुलींसाठी रंगीत छत्र्या आणि पुरूषांसाठी प्लेन काळी छत्री हे समीकरणही बदलले आहे. गडद निळी, चौकटी असलेल्या काळ्या छत्रीला पांढरा किंवा दुसऱ्या फिक्या रंगाचा प्लेन काठ असे पर्याय मुलांनी ट्राय करायला हरकत नाही.

लहान मुलांसाठी व्हरायटी

लहान मुलांसाठी रेनवेअर आणि छत्र्यांमध्ये खूप पर्याय उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी लाँग रेनकोट्स, कार्टून िपट्रचे आहेत. मुलांसाठी जर्कीनमध्येही टू सायडेड प्रकार आहेत. आतून फर असलेल्या उबदार जर्किन्सचाही पर्याय आहे. त्याशिवाय ट्रान्सपरंट रेनकोट्सचाही ट्रेंड आहे. छत्र्यांमध्ये कार्टून प्रिंट्सला अधिक मागणी आहे. यंदाच्या पावसाळ्यात ट्रेंडी राहायचे असेल, तर तुमच्या कम्फर्टनुसार छत्री किंवा रेनकोट यापकी एक निवडू शकता. शेवटी आपण कशात छान दिसतो व राहतो, हेच महत्त्वाचं ना!

पोंचो पॅटर्नची चलती

रेनकोट देखील तुम्हाला वेगळा लुक देऊ शकतो. सध्या रेनवेअर प्रकारात हल्ली पोंचो हा पॅटर्नचा ट्रेंड आहे. हूड असलेला थोडा लाँग रेनकोट असा हा प्रकार आहे. चौकोनी आकारातील हा रेनकोट मोकळा ढाकळा असतो. वापरायला सुटसुटीत, लहान होणारी घडी ही त्याची वैशिष्टय़े आहेत. पाठीवर सॅक असणाऱ्यांसाठी हा प्रकार उत्तम. हवेशीर असल्यानं ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. मुलांसाठी जíकन व पँट तसंच मुलींसाठी लाँग रेनकोट मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. यात मुलींसाठी रंगांमध्ये खूप मोठी व्हरायटी दिसते. गुलाबी, टरक्वाईज, लाल हे फेमिनाईन या रंगांचा सध्या ट्रेंड आहे.