How to control power of your eyes: सध्या दृष्टी कमकुवत होणे ही सामान्य समस्या होत आहे. पूर्वीच्या काळी विशिष्ट वयानंतर चष्मा वापरणं साधारण आहे. मात्र आता अगदी २ ते ३ वर्षाच्या मुलांनाही चष्मा लावण्याचा सल्ला दिला जातो. याला कारणीभूत आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीसुद्धा आहेतच. शिवाय वाढलेला स्क्रीन टाइम हादेखील एक प्रमुख घटक आहे. म्हणूनच डोळ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला चष्मा घालायचा नसेल किंवा तुमची दृष्टी आणखी खराब होऊ नये असं वाटत असेल तर तु्म्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल करणं आवश्यक आहे. शिवाय डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग करणं हेदेखील फायदेशीर ठरू शकतं. याबाबत योगतज्ज्ञ सांगितलेल्या काही उपायांबाबत जाणून घ्या…

चष्म्याचा नंबर कसा वाढतो?

कधीकधी चष्मा घातल्यानंतरही तुमच्या डोळ्यांचा नंबर वाढतच जातो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हे प्रामुख्याने आनुवांशिक असल्या कारणाने किंवा इतर घटांमुळे होते. म्हणजेच पुस्तक वाचणे, डिजिटल स्क्रीन वापरणे यामुळे डोळ्यांवर दीर्घकाळ ताण पडतो. ते डोळ्यांच्या स्नायूंना हळूहळू कमकुवत करतात आणि डोळ्यांच्या बुबुळाचा आकार बदलतात. हे घटक तुम्हाला आवश्यक असलेल्या चष्म्याचा नंबर वाढवतात.

चष्म्याचा नंबर वाढू नये यासाठी या ३ गोष्टी करा

योगतज्ज्ञ सांगतात की, जर तुम्हाला ,चष्मा लावायचा नसेल किंवा दृष्टीत सुधारणा व्हावी असे वाटत असेल, तर या तीन गोष्टी आवर्जून करायला सुरूवात करा. सर्वात आधी शक्य तितका वेळ बाहेर नैसर्गिक प्रकाशात घालवा. अंधारात किंवा मंद प्रकाशात काम करणे टाळा. कारण यामुळे डोळ्यांवर जास्त ताण येतो. दुसरी गोष्ट म्हणजे लॅपटॉप किंवा फोनवर काम करताना वारंवार ब्रेक घ्या. जास्त वेळ त्यांचा वापर टाळा. ते तुमच्या डोळ्यांजवळ येऊ नयेत याची काळजी घ्या. ठराविक अंतरावर ठेवून त्याचा वापर करा.

हे व्यायाम नियमितपणे करा

योगतज्ज्ञ सांगतात की, डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तु्म्ही काही लहान सहान गोष्टी करू शकता. डोळ्यांचं पंपिंग कर. हे करताना एका पेन्सिलच्या टोकाकडे वाहत रहा, हळूहळू पेन्सिल तुमच्या जवळ आणा आणि नंतर ती बाजूला घ्यावी. हा सुमारे ५० वेळा करा. तसंच झोपताना डोळे फिरवताना आठच्या आकारात फिरवा. जर तुम्ही काही काम करत असाल तर मध्ये ठेवलेल्या एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित का. नियमित डोळ्यांची तापणी करणेही गरजेचे आहे.