How To Get Rid Of Neck Fat Naturally : परफेक्ट जॉलाइन आणि रेखीव चेहऱ्यामुळे तुम्ही अधिक आकर्षक आणि सुंदर दिसता. मात्र मानेजवळ वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे तुमचं सौंदर्य पार बिघडून जाते. स्थूलतेमुळे अनेकदा मानेवर चरबी वाढते. याशिवाय वृद्धत्व, पाण्याची कमतरता, हायपरथॉयरॉईड्झम, थायरॉइड आणि पॉलिसिस्टिक ओव्हर सिंड्रोम इत्यादी कारणांमुळेही मानेवर चरबी वाढते. यामुळे ह्रदयरोग, मधुमेह आणि अति कोलेस्टॉलचा धोका वाढतो. यामुळे मानेवर वाढलेली चरबी लवकरात लवकर कमी करणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही फेशियल योगसने सांगणार आहोत ज्या माध्यमातून तुम्ही मानेजवळ वाढलेली अतिरिक्त चरबी काही दिवसातचं कमी करु शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लॉयन पोज

सिंह मुद्रा योगासनाने मानेवर जमा झालेली दुहेरी हनुवटी आणि चरबी काढून टाकण्यास मदत होते. हा योगाप्रकार करण्यासाठी तु्म्ही जीभ शक्य तितकी तोंडाबाहेर काढा आणि घशातून सिंहासारखा आवाज काढण्याचा प्रयत्न करा. हे .योगासन करताना होणाऱ्या आवाजामुळे मानेच्या मज्जातंतूंमध्ये तणाव निर्माण होतो. ज्यामुळे मानेची चरबी कमी करण्यास मदत होईल.

भुजंगासन

भुजंगासनामुळे केवळ शरीराची पोत सुधारण्यास मदत होत नाही तर मानेचे स्नायू देखील ताणतात. यामुळे मानेवर दिसणाऱ्या रेषा आणि अतिरिक्त चरबी देखील कमी होते.

उष्ट्रासन (कॅमल पोज)

उष्ट्रासनामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात त्यामुळे स्नायूंवर एक ताण जाणवतो. यामुळे शरीर सडपातळ आणि घट्ट होते, कॅमल पोजमुळे केवळ पोटाची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होत नाही तर मानेची चरबी देखील कमी होते.

नेक रोल

खांदा एकाजागी स्थिर ठेवून डावीकडून उजवीकडे फिरवा, यामुळे तुमच्या मानेच्या स्नायूंवर ताण जाणवेल, ज्यामुळे हनुवटीखाली वाढलेली चरबी आणि मानेजवळ वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होईल.

नेक स्ट्रेच एक्सरसाइज

पाठीवर झोपा, नंतर दीर्घ श्वास घेऊन वरच्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न करा. पण डोके जमिनीवर असावे, पण मान उंचावर ठेवा आणि श्वास सोडण्याचा प्रयत्न करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 best exercises to reduce neck fat at home sjr