What Is The Healthiest Breakfast In India : नाश्ता हा दिवसाची सुरुवात चांगली करण्याचा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे. पोट भरलं की, मन आनंदी राहतं. मन आनंदी असलं की, दिवसभर कामात लक्ष केंद्रित करायला मदत होते. पण, हेच जर तुम्ही अनहेल्दी पदार्थ सकाळी खाल्ले. तर मळमळते, उलटी सारखं वाटतं आणि या सगळ्याचा थेट परिणाम कामावर लक्ष केंद्रित करताना होतो.

त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी निरोगी आतडे खूप महत्वाचे आहे. निरोगी आतडे सकाळी तुम्ही जे खाता त्याच्यावर अवलंबून असतो. नाश्ता फायबरने समृद्ध, पचण्यास सोपा आणि कॅलरीजने कमी असावा. यामुळे पचन सुधारण्यास, आतड्यांतील मायक्रोबायोम संतुलित करण्यास आणि दिवसभर तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यास मदत होऊ शकते.त्यामुळे निरोगी आतड्यांसाठी तुम्ही अनेक नाश्त्याचे पर्याय निवडू शकता; जे २०० कॅलरीजपेक्षा कमी आहेत.

कोणते आहेत हे नाश्त्याचे पदार्थ चला जाणून घेऊयात…

मूग डाळीचं धिरडे – १ मूग डाळीच्या धिरड्यामध्ये १८० कॅलरीज असतात. भिजवलेल्या आणि कुस्करलेल्या मूग डाळीपासून बनवलेलं धिरडं पोटासाठी हलका, पचण्यास सोपा आणि तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर या धिरड्यांमध्ये आले आणि जिरे घातल्याने पचन सुधारण्यास मदत होते. पण, मूग डाळीचं धिरडे २०० कॅलरीजपेक्षा कमी ठेवण्यासाठी तेल योग्य वापरतो आहे का याची खात्री करा.

इडली – सकाळी नाश्त्याला तुम्ही २ लहान इडली खाल्ल्यात तर जवळजवळ तुम्हाला १८० कॅलरीज मिळतात. नैसर्गिकरित्या वाफवलेले, आंबवलेले तांदूळ आतड्यांच्या बॅक्टेरियासाठी चांगले असतात. इडलीचे नरम पोत पचवण्यास सोपी ठरते. कॅलरीज कमी ठेवण्यासाठी, चटणीमध्ये जास्त तेल टाकू नका.

पोहे – ३/४ कप पोहे खाल्ल्यास तुमच्या शरीराला १८० कॅलरीज मिळतात. पोहे पचायला सोपे असतात. पोह्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हळद आणि काही भाज्या त्यामध्ये घाला . यामुळे तुम्हाला फायबरयुक्त, प्रोबायोटिक-अनुकूल नाश्ता मिळतो; जो पचनासाठी चांगला आणि तुमचे आतडे संतुलित ठेवण्यास मदत करतो.

उपमा – १/२ कप उपमा खाल्ल्यास तुम्हाला जवळजवळ १९० कॅलरीज मिळतात . रवा आणि हलक्या तळलेल्या भाज्यांपासून बनवलेला उपमा तुम्हाला कॉम्प्लेक्स कार्ब्स, फायबर आणि इतर अनेक महत्त्वाचे खनिजे शरीराला देतात. कमीत कमी तेल वापरा आणि गाजर, वाटणे यासारख्या विविध प्रकारच्या भाज्या घाला जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही.

ओट्स डोसा – एका ओट्स डोसामध्ये १७० कॅलरीज असतात. ओट्समध्ये विरघळणारे फायबर असते; जे निरोगी आतड्याच्या मायक्रोबायोटाला आधार देते. फक्त दही आणि मसाले घालून पातळ पीठ बनवा आणि नॉनस्टिक पॅनमध्ये कमीत कमी तेलात शिजवा. कारण – यामुळे तुमच्या कॅलरीजची संख्या कमी राहते.