उकडलेल्या अंड्याच्या पाण्याचे फायदेः आरोग्यासाठी अंड्यांचे भरपूर फायदे आहेत. डॉक्टर दररोज अंडी खाण्याचा सल्ला देतात. परंतु अंड्यांशी संबंधित एक गोष्ट अशी आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल आणि ते म्हणजे अंडी उकळण्यासाठी वापरले जाणारे पाणी. अंडी उकडताना आपण पाणी घेतो आणि अंडी उकडून झाल्यानंतर ते पाणी सहज फेकून देतो. मात्र, हे अंड्याचे पाणी भरपूर फायदेशीर आहे. अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, उकडलेल्या अंड्याचे उरलेले पाणी कसे फायदेशीर ठरू शकते. पण हे खरे आहे. चला जाणून घेऊया उकडलेल्या अंड्यातील उरलेले पाणी कसे फायदेशीर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उकडलेल्या अंड्याच्या उरलेल्या पाण्याचे फायदे

पोषक तत्वे

अंड्याच्या कवचामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि सोडियमचे प्रमाण पुरेसे असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही अंडे उकळता तेव्हा हे घटक पाण्यात मिसळतात. हे सर्व घटक वनस्पतींसाठी खूप फायदेशीर आहेत. वनस्पतींना त्यांच्या पेशींच्या विकासासाठी या सर्व घटकांची आवश्यकता असते.

खत

उकडलेल्या अंडी किंवा अंड्याच्या कवचाचे पाणी वनस्पतींसाठी खत म्हणून काम करते. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात याची पुष्टी झाली आहे. हॅमिल्टनच्या मास्टर्स गार्डनर यांनी हा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासाच्या अहवालानुसार, तुम्ही ज्या पाण्यात अंडी उकळता. त्या पाण्यात अंडी उकळल्यानंतर अंड्यातील काही पोषक तत्त्वे येतात, जे झाडांसाठी खत म्हणून काम करतात.

टोमॅटोच्या झाडांसाठी फायदेशीर

अंडी उकडलेले पाणी अशा झाडांसाठी खूप फायदेशीर आहे जे सूर्यप्रकाशाअभावी अनेकदा खराब होतात. हे पाणी विशेषतः टोमॅटो आणि मिरचीच्या झाडांसाठी उपयुक्त आहे. ज्यामुळे अशी झाडे खराब होणार नाहीत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After boiling the egg do you throw away the water in it learn the amazing benefits of this water gps