सुंदर अथवा फॅशनेबल दिसाणे अनेकांना आवडते. त्यासाठी त्यांच्याकडून नानावीध गोष्टींचा अवलंब केला जातो. मेकअप करणे, नेल पॉलिश लावणे, वेगळ्या धाटणीची केशरचना ठेवणे, केस रंगविणे, फॅशनेबल कपडे-पर्स-चपला अथवा बुटांचा वापर अशा अनेक फॅशनेबल गोष्टींचा वापर करून, इतरांपेक्षा उठून दिसण्यासाठी प्रयत्न केला जातो. शरीरभर गोंदवून घेणे किंवा जिभेत, ओठात अथवा नाभीत रिंग अडकविण्यासारख्या धाडसी फॅशनचा अवलंबदेखील काहीजण करतात. फॅशनचे ट्रेण्डस् सतत बदलत असतात. क्वचित प्रसंगी त्यात नाविन्यपूर्ण फॅशनची भरदेखील पडते. पुढे अनेकजण त्याचा स्विकार करतात दिसतात. बगलेतील केस रंगविण्याची एक अनोखी फॅशन हल्ली पाहायला मिळत आहे. खासकरून स्लिव्हलेस कपडे घालण्यासाठी स्त्रिया बगलेतील केस काढतात. परंतु, काही धाडसी स्त्रियांनी बगलेतील केस वाढवून त्यांना गुलाबी, हिरव्या निळ्या आणि लाल रंगासारख्या गडद रंगांनी रंगविण्याचा मार्ग स्विकारला आहे. या धाडसी महिला रंगीत केस असलेल्या आपल्या बगलेची छायाचित्रे सेल्फीद्वारे सोशल मिडीयावर पोस्ट करत असून, ही छायाचित्रे नेटकरांचे लक्ष वेधून घेत आहे. तुम्हाला सुध्दा या फॅशनचे अनुकरण करायला आवडेल का?
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2014 रोजी प्रकाशित
फॅशन बगलेतले केस रंगविण्याची!
सुंदर अथवा फॅशनेबल दिसाणे अनेकांना आवडते. त्यासाठी त्यांच्याकडून नानावीध गोष्टींचा अवलंब केला जातो. मेकअप करणे, नेल पॉलिश लावणे, वेगळ्या धाटणीची केशरचना ठेवणे, केस रंगविणे

First published on: 12-12-2014 at 03:57 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Armpit hair coloring is a new beauty trend