Ayurvedic Drink for Cholesterol Control: कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे किंवा रक्तवाहिन्या (शिरा) बंद झाल्यामुळे आज अनेकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा अचानक दम लागणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. अशा वेळी लोक महागड्या औषधांचा आणि उपचारांचा मार्ग निवडतात; पण तुम्हाला ठाऊक आहे का घरातच असा एक चमत्कारी रस तयार करता येतो, जो केवळ १४ दिवसांत शरीरातील घातक चरबी (वाईट कोलेस्ट्रॉल) कमी करून शिरांमधील ब्लॉकेज दूर करू शकतो.
हा कोणताही विदेशी उपाय नाही, तर आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंनी तयार होणारं ते एक ‘देशी अमृत’ आहे. या रसात आहे लसूण, लिंबू, आलं, मध व अॅपल सायडर व्हिनेगर हे पाच घटक एकत्र आल्यावर जणू औषध नाही, तर नैसर्गिक हृदय संजीवनी तयार होते.
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी यांच्या मते, धमन्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यास अँजायना (छातीत दुखणे), छातीतील वेदना आणि श्वास घेण्यास त्रास अशी गंभीर लक्षणं दिसू शकतात. या ब्लॉकेजवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या औषधांचा, रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा आणि ब्लॉकेज कमी करणाऱ्या औषधांचा वापर केला जातो. मात्र, या औषधांसोबत काही देशी आयुर्वेदिक उपाय अवलंबले, तर तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवू शकता आणि धमन्यांतील ब्लॉकेजही कमी करू शकता. पाहूया कोणते आहेत हे उपाय…
लसूण : शरीरातील विषारी चरबीचा शत्रू
लसणामध्ये ‘अॅलिसिन’ नावाचा एक घटक असतो, जो शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतो आणि चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवतं. लसूण रक्त पातळ करतो, रक्तप्रवाह सुधारतो आणि शिरांमधील वाढलेली चरबी काढून टाकतो.
लिंबू : शिरांतील घाण साफ करणारा नैसर्गिक क्लीनर
लिंबामध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स हे घटक रक्तवाहिन्यांतील जळजळ कमी करतात. दररोज लिंबाचा रस घेतल्यास शिरांमधील ब्लॉकेज हळूहळू कमी होतात आणि हृदयावरील ताण हलका होतो.
आले : सूज आणि थकवा दूर करणारा चमत्कार
आल्यामध्ये ‘जिंजरॉल’ हे संयुग असतं, जे रक्तप्रवाह सुधारतं आणि शिरांमध्ये जळजळ निर्माण होऊ देत नाही. आलं केवळ कोलेस्ट्रॉल कमी करीत नाही, तर शरीरातील रक्ताची शुद्धताही टिकवून ठेवतं.
मध : हृदयाला गोड आरोग्य देणारा उपाय
मध हा फक्त गोड पदार्थ नाही, तर एक औषधी अमृत आहे. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स रक्त शुद्ध करतात, थकवा घालवतात व शिरांतील दाह कमी करतात. दररोज सकाळी एक चमचा मधाचा वापर रक्तप्रवाह सुरळीत ठेवतो.
अॅपल सायडर व्हिनेगर : कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणारा जादूगार
अॅपल सायडर व्हिनेगरमधील अॅसिटिक अॅसिड LDL कमी करून HDL वाढवतो. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो. अॅपल सायडर व्हिनेगर आणि लसूण एकत्र घेतल्यास त्याचे परिणाम अधिक वेगाने दिसतात.
हा चमत्कारी रस कसा तयार कराल?
एका मिक्सरमध्ये ४-५ लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आले आणि चार लिंबांचा रस घाला. त्यात एक कप अॅपल सायडर व्हिनेगर आणि एक कप मध मिसळा. हे मिश्रण एका काचेच्या बाटलीत साठवा. दररोज सकाळी उठल्यावर एक चमचा हा रस एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या. फक्त १४ दिवसांत शरीर हलकं वाटेल, श्वास घ्यायला त्रास कमी होईल आणि हृदयातली जडता नाहीशी होईल.
हा चमत्कारी रस म्हणजे आपल्या घरातलीच लसूण-लिंबू-आले-मध-अॅपल सायडर व्हिनेगरची आरोग्य संजीवनी! केवळ पाच रुपयांचा लसूण आणि घरातील चार साध्या वस्तूंच्या संगमाच्या परिणामामुळे बंद झालेल्या शिरा उघडतात, कोलेस्ट्रॉल वितळते आणि हृदय पुन्हा जोमाने कार्य करू लागते.
