Baby born in Navratri: हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या काळात दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीत देवीभक्त उपवास करतात, देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध धार्मिक विधी करतात. नवरात्रीत लग्न, गृहप्रवेश समारंभ किंवा मुंडन समारंभ यासारखे शुभ समारंभ केले जात नाहीत. असं असताना जेव्हा नवरात्रीत बाळाचा जन्म होतो तेव्हा लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की त्यांचे भाग्य असेल, तर याबाबतच जाणून घेऊ…
नवरात्रीत जन्मलेली मुल भाग्यवान
ज्योतिशशास्त्रानुसार, नवरात्रीत जन्मलेली मुलं अतिशय भाग्यवान असतात. ही मुलं दुर्गा मातेकडून विशेष आशीर्वाद घेऊन येतात. त्यांच्या आयुष्यात अनेकदा सकारात्मक घटना घडतात आणि त्या त्यांच्या कुटुंबात आनंद आणि समृद्धी आणतात. अशी मुले कुटुंबात सन्मान आणि आनंद घेऊन येतात.
बुद्धिमान आणि यशस्वी
नवरात्रीच्या पवित्र दिवसांत जन्माला येणाऱ्या मुलांना जन्मापासूनच विशेष ऊर्जा मिळते. दुर्गा मातेच्या कृपेने ही मुले बुद्धिमान आणि मेहनती असतात. त्यांच्या समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने ते त्यांच्या अभ्यासात, करिअरमध्ये किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवतात. त्यांना पुढे जाण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागत नाही, तर संधी त्यांच्याकडे चालून येतात.
सकारात्मक आणि आनंदी स्वभाव
या मुलांचा स्वभाव आनंदी आणि मनमिळाऊ असतो. ते सहज कोणाशीही मैत्री करू शकतात आणि त्यांच्या स्वभावाने लोकांचं मन जिंकतात. त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदी स्वभाव लोकांना त्यांच्याभोवती असण्याचा आनंद देतो.
मुलगी जन्माला आल्यास विशेष महत्त्व
नवरात्रीत मुलीचा जन्म अत्यंत शुभ मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार, या काळात जन्मलेल्या मुली साक्षात देवी आईचे रूप असतात. घरात दुर्गा मातेचे आशीर्वाद घेऊन ती येते आणि कुटुंबात सुख-समृद्धी आणते असे मानले जाते.
कुटुंबासाठी असतात शुभ संकेत
नवरात्रीत बाळांचं आगमन हे कुटुंबासाठी शुभ मानलं जातं. ते कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढवतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणतात.