Cancer Cure Fruit: फळे आणि त्यांचे रस हे शरीरासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अननस हे असंच एक फळ आहे, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. अननसाचा रस हा केवळ एक ज्यूस नसून पोषणाने भरलेलं सुपरफूड आहे. यात व्हिटॅमिन C, B-कॉम्प्लेक्स, मॅंगनीज, पोटॅशियम असे खनिज आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात.
अननसामध्ये खास करून ब्रोमेलेन नावाचा एन्झाइम असतो, जो शरीराला अनेक प्रकारे फायदा करतो. नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते, सूज कमी होते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि त्वचेची चमक टिकून राहते. पण, यात नैसर्गिक साखर असल्यामुळे तोलामोलाने सेवन करणे गरजेचे आहे. दररोज एक ग्लास म्हणजेच १५०–२०० मिली अननसाचा रस पिणे फायदेशीर ठरते. क्लिनिकल डायटिशियन आणि सेलिब्रिटी कोच सिमरत कथूरिया यांनी अननसाच्या रसाचे फायदे सांगितले आहेत.
दररोज एक ग्लास म्हणजेच १५०–२०० मिली अननसाचा रस पिणे फायदेशीर ठरते. क्लिनिकल डायटिशियन आणि सेलिब्रिटी कोच सिमरत कथूरिया यांनी अननसाच्या रसाचे फायदे सांगितले आहेत.
अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध
अननसाच्या रसात पॉलीफेनॉल्ससारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज यापासून वाचवतात. हे फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या इतर दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करतात.
हायड्रेटिंग आणि इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध
अननसामध्ये साधारणपणे ८५% पाणी असते. त्याचा रस शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवतो. यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरातील पाणी-संतुलन टिकवतात. उन्हाळ्यात किंवा व्यायामानंतर तो पिणे उत्तम पर्याय आहे.
रोगप्रतिकारक शक्तीला नैसर्गिक वाढ मिळते
अननसाचा रस शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो, कारण त्यात व्हिटॅमिन C, बी-व्हिटॅमिन, कॉपर, मॅंगनीज आणि ब्रोमेलेन असतात. ब्रोमेलेन सूज कमी करतो आणि संसर्गापासून बचाव करतो.
सूज कमी करण्यास मदत करणारे
साधारण मेटाबॉलिझममुळे होणारा ऑक्सिडेटिव स्ट्रेस शरीरात सूज निर्माण करतो. अननसाच्या रसात असलेला ब्रोमेलेन सांधेदुखी (आर्थरायटिस), इजा किंवा शस्त्रक्रियेनंतर होणारी सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतो.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
अननसाच्या रसातील बी-व्हिटॅमिन्स आणि ब्रोमेलेन रक्तप्रवाह सुधारते आणि हृदयाच्या आजाराचा धोका कमी करते.
पचन सुधारते
ब्रोमेलेन हा एक एंझाइम आहे, जो प्रोटीन पचवायला आणि तोडायला मदत करतो. यामुळे गॅस, ब्लोटिंग आणि अपचन यांसारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो. नियमित सेवन केल्यास पचन सुधारते.
हाडे मजबूत करा
मॅंगनीज हाडे मजबूत आणि घट्ट ठेवण्यासाठी महत्त्वाचा असतो. नियमितपणे अननसाचा रस प्यायल्यामुळे हाडं कमजोर होण्याचा धोका कमी होतो.