CBSE XII: पहिल्या सत्राची परीक्षा आजपासून; विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे तपशील आणि मार्गदर्शक सूचना

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या १२ वी बोर्डाच्या पहिल्या सत्राची परीक्षा आजपासून आहे.

cbse-1200-1
CBSE XII: पहिल्या सत्राची परीक्षा आजपासून; विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे तपशील आणि मार्गदर्शक सूचना (संग्रहित फोटो)

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या १२ वी बोर्डाच्या पहिल्या सत्राची परीक्षा आजपासून आहे. परीक्षा २२ डिसेंबरपर्यंत असणार आहेत. विद्यार्थी पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठीचा रोल नंबर आणि प्रवेशपत्रे cbse.gov.in वर पाहू शकतात. प्रवेशपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरावा लागेल. पहिल्या सत्राची परीक्षा Multiple Choice Questions च्या आधारावर असून ९० मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी शीटमध्ये a, b, c आणि d असे पर्याय असतील आणि त्या समोर गोल असेल. योग्य उत्तर असलेलं गोल गडद करावा लागेल. चार पर्यांयाखाली एक रिक्त बॉक्स असेल. त्यात निवडलेला पर्याय a, b, c आणि d यापैकी योग्य उत्तर लिहिवं. बॉक्समध्ये लिहिलेलं उत्तर अंतिम मानलं जाईल.

ओएमआर शीट्सवर फक्त निळ्या किंवा काळ्या बॉल पॉइंट पेननं लिहिण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पेन्सिल वापरण्यास मनाई असून तसं केल्यास विद्यार्थ्यावर कारवाई केली जाईल.

परीक्षेत हे नियम पाळायला विसरू नका

  • विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र सोबत नेण्यास विसरू नये, त्याशिवाय त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
  • परीक्षेची वेळ मर्यादा ९० मिनिटांची असेल.
  • विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी २० मिनिटे देण्यात येणार आहेत.
  • विद्यार्थ्यांना रफ पेपर वेगळा दिला जाईल.
  • परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी निळा किंवा काळा बॉल पेन सोबत ठेवावा.
  • विद्यार्थ्यांनी ओएमआर शीटवर पेनाशिवाय इतर काहीही वापरू नये, पेन्सिल वापरण्यासही बंदी आहे.
  • विद्यार्थ्यांनी परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाऊ नये.
  • विद्यार्थ्यांनी मास्क घालावे आणि सॅनिटायझर सोबत ठेवावे.

बारावी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार आज समाजशास्त्राचा पेपर आहे. त्यानंतर ३ डिसेंबरला इंग्रजी, ६ डिसेंबरला गणित, ७ डिसेंबरला शारीरिक शिक्षण, ८ डिसेंबरला व्यवसाय अभ्यास, ९ डिसेंबरला भूगोल आणि १० डिसेंबरला भौतिकशास्त्राची परीक्षा असेल. तर ११ डिसेंबरला मानसशास्त्र, १३ डिसेंबरला अकाँउंट, १४ डिसेंबरला रसायनशास्त्र, १५ डिसेंबरला अर्थशास्त्र, १६ डिसेंबरला हिंदी, १७ डिसेंबरला पॉलिटिकल सायन्स, १८ डिसेंबरला बॉयोलॉजी, २० डिसेंबरला इतिहास, २१ डिसेंबरला कम्प्यूटर सायन्स आणि २२ डिसेंबरला होम सायन्सची परीक्षा असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cbse class 12 term 1 exams important details and guidelines rmt

Next Story
जागतिक एड्स दिन २०२१: जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि एड्स आजाराविषयी गैरसमज
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी