चिया सीड्स मानवी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत आणि या बियांचे नियमित सेवन करण्याची शिफारस आरोग्य तज्ज्ञ करतात. या बियांपासून जास्तीत जास्त आरोग्य लाभ मिळविण्यासाठी, त्या बिया खाण्यापूर्वी काही तास भिजवत ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही या बिया पाण्यात किंवा दुधातदेखील भिजवू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅट्स असतात, जे हृदयासाठी गुणकारी असतात. तसेच हे फॅट्स जळजळ कमी करतात आणि मेंदूच्या आरोग्यास उपयुक्त ठरतात. तसेच यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राहते आणि पचनास मदत होते.

हेही वाचा… अन्नाबरोबर पाणी प्यायल्याने गॅस किंवा अपचन होऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

चिया सीड्स भिजवल्याने त्या फुगतात. त्यामुळे एक जेल तयार होते, जे ब्लोटिंग कमी करते. त्यामुळे रक्तातील साखर आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

चिया सीड्स भिजवल्यावर पाणी शोषून घेतात आणि त्या त्यांच्या वजनाच्या १२ पट वाढतात. त्यामुळे या सीड्स हायड्रेशनसाठी उत्कृष्ट बनतात. कारण- त्या शरीरात हळूहळू पाणी सोडतात आणि शरीराला जास्त काळ हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. विशेषत: व्यायाम केल्यानंतर किंवा गरम हवामानात या बिया उपयुक्त ठरतात.

हेही वाचा… पोळी शिळी झालीय मग फेकून देताय? ‘हे’ आरोग्यदायी फायदे पाहून व्हाल अवाक

अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध

चिया सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट्सची उच्च पातळी असते, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह डॅमेजपासून पेशींचे संरक्षण करतात. भिजविलेल्या चिया सीड्सचे नियमित सेवन केल्याने वृद्धत्व कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास साह्यभूत

भिजवलेल्या चिया सीड्स पोटात फुगतात. त्यामुळे भूक कमी लागू शकते आणि जास्त खाणे आपोआप टळू शकते.

हृदयाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट

चिया सीड्समध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिडस्, फायबर व अँटिऑक्सिडंट्सचे मिश्रण हृदयाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट आहे. हे पोषक घटक खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास, चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढविण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

ऊर्जेचा चांगला स्रोत

चिया सीड्स हे स्लो-रिलीज कार्बोहायड्रेट्सचे पॉवरफुल सोर्स आहेत; ज्यामुळे ते ऊर्जा आणि सहनशक्ती वाढविण्यास मदत करतात.

चिया सीड्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस हे घटक जास्त प्रमाणात असतात, जे हाडे आणि दात मजबूत राखण्यासाठी आवश्यक असतात. भिजविलेल्या चिया सीड्सचे नियमित सेवन केल्याने हाडांची घनता सुधारण्यास मदत होते. तसेच, ऑस्टिओपोरोसिसचा (Osteoporosis) धोकाही कमी होतो.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत

भिजवलेल्या चिया सीड्स रक्तप्रवाहात होणारे साखरेचे शोषण कमी करतात. परिणामी रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे विशेषतः मधुमेहींंसाठी चिया सीड्स फायदेशीर ठरतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chia seeds health benefits soaked chia seeds benefits and direction to use dvr