Colon Cancer symptoms: आतड्यांमध्ये किंवा गुदाशयाच्या ऊतींमध्ये विकसित होणारा आतड्याचा कॅन्सर हा जगभरातील पुरुष आणि महिला दोघांमध्येही सर्वांत सामान्य प्रकारच्या कर्करोगांपैकी एक आहे. हा असाध्य विकार मोठ्या आतड्यात सुरुवात करून, तो बहुतेकदा पॉलीप्स नावाच्या पेशींच्या लहान, कर्करोग नसलेल्या गुठळ्यांपासून विकसित होतो. जगभरातील कर्करोगाच्या सर्वांत सामान्य प्रकारांपैकी हा एक आहे. युनायटेड स्टेट्समध्ये हे कर्करोगाच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.

सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे तरुणांमध्ये कोलन कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. अलीकडच्या काळात, डॉक्टरांनी कोलन कर्करोगाशी संबंधित एक धक्कादायक रिपोर्ट पाहिला, जो आधी विशेषत: वृद्धाचा आजार मानला जात होता, तो आता ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही अधिकाधिक प्रभावित करीत आहे.​या आजारापासून वाचण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे ही पहिली गरज आहे. धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यासोबतच आहारात काही विशिष्ट भाज्या घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.

लक्षणं कोणती ?

लक्षणांमध्ये वारंवार बद्धकोष्ठता किंवा जुलाब होणे, मलात रक्त दिसणे, पोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे, अकारण वजन कमी होणे आणि सतत थकवा जाणवणे यांचा समावेश होतो. ही लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या.

अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, स्मार्ट आहारातील निवडी खरा फरक करू शकतात, विशेषतः क्रूसिफेरस भाज्यांचा समावेश असलेल्यांमध्ये. या भाज्यांमध्ये आढळणारी ग्लूुकोसाइनोलेट्स नावाची संयुगे शरीरात पचताना तुकडे होऊन अशा घटकांमध्ये बदलतात, जी सूज कमी करण्याचे काम करतात. सूज ही अनेकदा कर्करोगाच्या वाढीस कारणीभूत ठरते. या भाज्या ही सूज टाळण्यास मदत करतात. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि शरीराला कर्करोगाशी लढण्याची ताकद मिळते. बीएमसी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका मोठ्या पुनरावलोकनात असे सूचित केले गेले आहे की, दररोज फक्त २०-४० ग्रॅम भाज्या खाल्ल्याने कोलन कर्करोगाचा धोका २०-२६% पर्यंत कमी होऊ शकतो.

ब्रोकोली

ब्रोकली ही अशी भाजी आहे की, ज्यामुळे कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, अस्थमा यांसारख्या गंभीर आजारांपासूनही आपला बचाव होऊ शकतो. ब्रोकोली यकृतासाठीही खूप फायदेशीर आहे. ही भाजी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. ब्रोकोलीचे सेवन यकृताशी संबंधित समस्यांपासून आराम देण्याचे काम करते. आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा बोक्रोली या भाजीचे सेवन केल्यास टाईप-२ मधुमेह, हृदयविकार, अस्थमा व कर्करोग यांना आळा घालता येतो, असे संशोधन अमेरिकी संशोधकांनी केले आहे.

फ्वॉवर

ब्रोकोलीप्रमाणेच फुलकोबी ही भाजी ग्लुकोसिनोलेट्स व व्हिटॅमिन सीने भरलेली आणि अतिशय पौष्टिक अशी आहे. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य राखते.

लाल कोबी

लाल कोबीमध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात. लाल असो वा पांढरा, कोबीमध्ये फ्लेव्होनॉइड्स, अँथोसायनिन्स, फायबर, व्हिटॅमिन के आणि कर्करोगाशी लढणारे फायटोकेमिकल्स असतात. कोबी ताज्या सॅलडमध्ये टाकून किंवा भाजी बनवूनही तुम्ही खाऊ शकता.

केल

केल, ज्याला पानांचा कोबी म्हणूनही ओळखले जाते. त्यामध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स व ग्लुकोसिनोलेट्सने भरलेली पौष्टिकता आहे. नियमित केलचे सेवन पचनास मदत करते आणि आतड्याचा कर्करोग रोखण्यास मदत करू शकते. जीवनसत्त्वे अ, क, के, फायबर व कॅरोटीनॉइड्सने समृद्ध, हे मजबूत अँटी-इंफ्लेमेटरी ग्रीन हेल्दी ब्रेकफास्ट स्मूदीजसाठी एक सुपरफूड आहे.

ब्रुसेल्स स्प्राउट्स

ब्रुसेल्स स्प्राउट्स हे फायबर, व्हिटॅमिन सी व के आणि ग्लुकोसिनोलेट्सने समृद्ध असलेले मिनी-कोबीज आहेत. बाजारात अनेक जाती उपलब्ध आहेत – काही जांभळ्या रंगाचे आहेत, जसे की ‘रुबी क्रंच’ किंवा ‘रेड बुल’ जळजळ होण्यावर नियंत्रण व आतड्याच्या कर्करोगापासून संरक्षण एकंदरीत आतड्यांच्या आरोग्यासाठी या भाज्या उत्तम आहेत.