Colon cancer symptoms: आतड्याच्या कर्करोगाला कोलोरेक्टल कर्करोग असेही म्हणतात. हा कर्करोग सहसा मोठ्या आतड्याच्या (कोलन) आतील अस्तरात सुरू होतो. हा कर्करोग हळूहळू वाढतो, परंतु तो जर वेळेत ओळखला गेला नाही आणि उपचार केले गेल नाहीत तर तो आतड्यात खोलवर पसरू शकतो. आतड्याचा कर्करोग मोठ्या आतड्यात सुरू होतो, विशेषतः आतड्यात किंवा गुदाशयात. या कर्करोगासाठी अनेक घटक जबाबदार असू शकतात, जसे की आहारात कमी फायबर आणि जास्त चरबीचे सेवन, दीर्घकालीन मादक पदार्थांचे सेवन,वाढता लठ्ठपणा, चुकीची जीवनशैली, क्रोहन किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिससारख्या आतड्यांचा जुनाट दाह, कौटुंबिक इतिहास आणि अनुवांशिक कारणेदेखील जबाबदार असू शकतात.
आहार आणि जीवनशैली सुधारून शरीर सक्रिय ठेवून, या आजाराचा धोका टाळता येतो. तुमच्या आहारात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांसारखे फायबरयुक्त पदार्थ समाविष्ट करा. धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहा. वेळोवेळी कोलोनोस्कोपी चाचणी करून घ्या. वयाच्या ४० व्या वर्षानंतर ही चाचणी करून घेणे आवश्यक आहे. जर शरीरात दीर्घकाळापर्यंत कोणतीही लक्षणे दिसली तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. कोलन कर्करोग रोखण्यासाठी त्याची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. आतड्याचा कॅन्सर हा एक आजार आहे, जो सुरुवातीला अगदी सौम्य लक्षणे दाखवतो, परंतु कालांतराने तो प्राणघातक ठरू शकतो, म्हणून शरीरातील लहान बदलांनाही गांभीर्याने घ्या.
हार्वर्ड, एम्स आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी कोलन कर्करोगाची अशी ८ लक्षणे सांगितली आहेत जी दुर्लक्षित केल्यास प्राणघातक ठरू शकतात. शरीरात कोलन कर्करोगाची लक्षणे कोणती आहेत हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. डॉ. सेठी म्हणाले की, असामान्य विष्ठेचा रंग, वजन कमी होणे आणि शरीरात दिसणारी काही इतर लक्षणे तुम्हाला कोलन कर्करोग असल्याचे दर्शवतात. डॉक्टरांनी आतड्याच्या कर्करोगाची लक्षणे सांगितली आहेत.
मलमध्ये रक्त
मलमध्ये लाल किंवा काळे रक्त हे कोलन कर्करोगाचे लक्षण असू शकते. मलमध्ये असलेल्या या रक्ताला मूळव्याधीचे लक्षण म्हणून दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
आतड्यांच्या सवयींमध्ये बदल
पोट साफ सवयींमध्ये बदल हे देखील कोलन कर्करोगाचे लक्षण असू शकते. बद्धकोष्ठता, अतिसार किंवा अनेक दिवसांपर्यंत पातळ मल येणे ही गंभीर लक्षणे असू शकतात.