Reduce Bad Cholesterol Naturally: आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो आहे. शरीरातील वाढत गेलेला खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी मोठा धोका आणि यामुळे गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळते.

शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण संतुलित ठेवणं आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवल्यास हृदय विकार, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आजारांचा धोका कमी होतो. यासाठी आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत योग्य बदल करणे आवश्यक आहे. फक्त तुमच्या दररोजच्या दोन वेळच्या पोळीच्या तयारीत थोडे बदल करूनही तुम्ही तुमचं स्वास्थ्य सुधारू शकता, कसे ते जाणून घेऊयात…

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी पोळीमध्ये या गोष्टी मिसळा

१. अळशीच्या बिया

अळशी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अळशीची मदत होते. बीजांना पेस्ट किंवा पावडर करून त्याच्या पिठात २-४ चमचे अळशी पावडर घालून पोळी तयार करा. ही पोळी हृदयासाठीही फायदेशीर असून, याच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

२. ओट्स

प्लेन ओट्स बारीक करून पावडर बनवा आणि पिठात थोडे ओट्स मिसळा. ओट्समध्ये घुलनशील फायबर असतो, जो नसांतील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढतो, तसेच वजन कमी करण्यासही मदत करतो.

३. इसबगोलची भूसी

इसबगोल हे एक असे हर्ब आहे, जे आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते. इंग्रजीत त्याचे सायलियम हस्क (Psyllium Husk) असे नाव आहे. हे एक आरोग्यास अनुकूल उत्पादन आहे. याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. पिठात इसबगोलची भूसी मिसळल्यास ही पोळी पोट साफ ठेवते, वाढलेलं वजन कमी करते आणि शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल घटवते.

४. चण्याचे पीठ

उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी साध्या गव्हाच्या पोळीत फक्त गव्हाचं नाही तर चण्याचं पीठसुद्धा मिसळावं. चण्याच्या पिठामध्ये फायबर जास्त असल्यामुळे पोळी आणखी हेल्दी होते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

छोट्या बदलांनी आरोग्यावर मोठा परिणाम

ही साधी पण परिणामकारक पोळीची ट्रिक दररोजच्या आहारात समाविष्ट केल्यास वजन नियंत्रण, खराब कोलेस्ट्रॉल कमी करणे आणि हृदयाची ताकद वाढवणे शक्य आहे. केवळ थोड्या प्रमाणात बदल करून तुम्ही तुमचा दैनंदिन आहार अधिक आरोग्यदायी आणि फायदेशीर बनवू शकता.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)