tomato-kadhi-cvrभारतासारख्या विविध संस्कृतीने नटलेल्या देशात पाककृतीतदेखील वैविध्य आढळून येते. एकाच प्रकारच्या खाद्यपदार्थाच्या पाककृतीत आढळून येणारे राज्याराज्यातील वैविध्य ही यातील विशेष बाब आहे. खाद्यपदार्थांच्या बाबतीत प्रत्येक राज्याचा आणि संस्कृतीचा आपला असा अनोखा स्वाद आणि पाककृती आहे. टोमॅटोपासून बनविण्यात आलेल्या ‘टोमॅटो कढई’चा स्वाद घेण्याचे भाग्य अलिकडेच मला लाभले. कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं ‘टोमॅटो कढई’ आणि ‘टोमॅटो सूप’मध्ये फरक तो काय? परंतु, ‘टोमॅटो सूप’साठी हा एक उत्कृष्ट पर्याय ठरू शकतो, दोघांमधील फरक जाणून घेण्यासाठी बनवून पहा ‘टोमॅटो कढई’!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टोमॅटो कढई
तयारीसाठीचा वेळ : ५ मिनिटे, तयार करण्यासाठीचा वेळ : १५ मिनिटे, दोनजण खाऊ शकतात

साहित्य:
७ ते ८ टोमॅटो, चिमूटभर हिंग, ४ चमचे बेसन, १ चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, १ चमचा साखर, अर्धा चमचा मेथी दाणे, मीठ चवीनुसार, ५ ते ६ कढीपत्त्याची पाने, १ चमचा ऑलिव्ह ऑईल, २ सुक्या लाल मिर्च्या (अर्ध्या करून घेणे), चिरलेली कोथिंबीर

पाककृती:
टोमॅटो धुऊन स्वच्छ करून कापून घ्या. एका स्वच्छ भांड्यात हॅण्ड ब्लेंण्डरने या कापलेल्या टोमॅटोची चांगली प्युरी करा. टोमॅटो प्युरीमध्ये बेसन, हळद, लाल तिखट, मिठ आणि साखर घालून ब्लेंण्डरने ढवळून चांगले एकत्र करा. दोन कप पाणी घालून पुन्हा ढवळून घ्या. डीप नॉन-स्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, मेथी, हिंग, जिरे, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरचीचे तुकडे घालून, खमंग वास येईपर्यंत २ ते ३ मिनिटे ढवळा. आधी तयार केलेले टोमॅटोचे मिश्रण यात घाला आणि व्यवस्थित एकत्र करून, चांगली ऊकळी येईपर्यंत सतत ढवळत राहा. मंद आचेवर कढईतील मिश्रण १० मिनिटांसाठी उकळू द्या. तयार झालेली ‘टोमॅटो कढई’ एका बाऊलमध्ये काढून, कोथिंबिरीने सजवा. भाताबरोबर गरमगरम ‘टोमॅटो कढई’ सर्व्ह करा!
(सौजन्य : अशिमा गोयल सिराज)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Craving for kadhi chawal try making tomato kadhi for a change