हिंदू धर्मात कासवाला विष्णूचा अवतार मानलं जातं. विष्णूच्या दहा अवतारांमध्ये त्याचा समावेश होतो. दुसरा अवतार म्हणून समुद्रमंथनातून कासवाचा उदय झाला. असं मानलं जातं की भगवान विष्णू कच्छप अवतारात आले आणि त्यांनी मंदार पर्वत आपल्या पाठीवर धारण केलं. त्यामुळे आजही त्याची पूजा केली जाते. याशिवाय कासवाला वास्तुशास्त्रातही शुभ मानलं जातं. वास्तूनुसार घरात धातूचा कासव ठेवणं शुभ असतं. घर किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल कासव ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. जाणून घ्या घरात किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल कासव ठेवणं कसं शुभ असतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिस्टल कासव ठेवण्याचे फायदे (Crystal Turtle Benefits)

  • डोक्याजवळ घेऊन झोपल्यास झोप न येण्याची समस्या दूर होते.
  • घराच्या मंदिरात पिवळ्या कपड्यांमध्ये क्रिस्टल कासव ठेवल्यास शुभफळ प्राप्त होतात.
  • आर्थिक लाभासाठी क्रिस्टल टर्टल तिजोरीत ठेवावे.
  • कुटुंबात सुख-शांती राहण्यासाठी मुख्य खोलीत ठेवा.
  • क्रिस्टल धातू आणि कासव हे दोन्ही लक्ष्मीजींना प्रिय आहेत. त्यामुळे वास्तू तज्ज्ञ घरामध्ये ठेवण्याचा सल्ला देतात. कारण असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही.

आणखी वाचा : Shani Rashi Parivartan: २०२२ मध्ये शनी ग्रह बदलणार पुढील राशी, जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांवर असणार शनीची नजर

चांगले परिणाम मिळविण्यासाठी क्रिस्टल कासव घराच्या किंवा घराच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य दरवाजावर किंवा उत्तर दिशेला लावावे.
वास्तूनुसार मातीचे कासव घर किंवा ऑफिसच्या पूर्व, उत्तर किंवा नैऋत्य दिशेला ठेवावे. या दिशेला हे सर्व शुभ फल देते. जर कासव लाकडाचे असेल तर त्याला पूर्व किंवा आग्नेय दिशेला ठेवणे शुभ असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crystal turtle gives immense wealth keep it like this at home or office prp