Dark Circles Home Remedies: झोपेचा अभाव, ताणतणाव आणि हायड्रेशनमुळे अनेकांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. हे केवळ विचित्र दिसत नाहीत तर चेहऱ्याचे सौंदर्य देखील कमी करतात. बदलेल्या जीवनशैलीमुळे कामाच्या पद्धती बदलल्या आहेत.ज्याचा आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतोय. रात्री उशिरापर्यंत काम करणे, दिवसभर स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे यांसारख्या इतर कारणांमुळे आपल्याला डार्क सर्कलची समस्या सतावते अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या गोष्टींचा त्रास होत असेल तर तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता. यासाठी तुम्हाला कोरफडीमध्ये २ गोष्टी मिसळून लावाव्या लागतील. यामुळे तुमचे काळे वर्तुळ कमी होतील आणि निस्तेज डोळे सुंदर होतील, त्वचेचा ग्लो वाढतच जाईल
कोरफड आणि हळद
जर तुम्हाला काळ्या वर्तुळांचा त्रास होत असेल तर कोरफड आणि हळद मिसळून लावायला सुरुवात करा. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत जे काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात. यासाठी अर्धा चमचा कोरफड आणि हळद डोळ्यांखाली घासून घ्या.
कोरफड आणि बटाट्याचा रस
बटाट्याचा रस आणि कोरफड यांचे मिश्रण डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते. बटाट्याच्या रसात नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. यामुळे काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. हे लावण्यासाठी, एका भांड्यात अर्धा चमचा कोरफड जेल घाला. यानंतर, त्यात २ चमचे बटाट्याचा रस घाला. ही पेस्ट मिसळा आणि प्रभावित भागावर १५ मिनिटे लावा. त्यानंतर, ते धुवा.
जायफळ आणि दूध
सगळ्यात आधी जायफळ आणि दूध घेऊन ते घासून घ्या. त्यानंतर ज्येष्ठमधाचा पावडर घालून त्याची जाडसर पेस्ट तयार होईल. ही पेस्ट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी क्लींजर किंवा फेसवॉश चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर बोटावर तयार केलेली क्रीम घेऊन डोळ्यांभोवती मसाज करा. १० मिनिटानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. नियमितपणे त्वचेची काळजी घेतल्याने काही दिवसांत काळी वर्तुळे निघून जाण्यास मदत होईल.
कोरफड आणि मध
काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तुम्ही कोरफड जेल आणि मध यांचे मिश्रण लावू शकता. यासाठी अर्धा चमचा मध अर्धा चमचा कोरफड जेलमध्ये मिसळा. तयार केलेली पेस्ट डोळ्यांभोवती लावा आणि १५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ते धुवून स्वच्छ करा.